▪️जिबगांव येथे राज्यशासन सेलिब्रेटी : भारत गणेशपुरे येणार..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
सावली – ( इंडिया 24 न्युज ) :
सावली तालुक्यातील जिबगांव येथे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रेट सेलिब्रेटी भारत गणेशपुरे यांचे आगमन दिनांक 10/03/2026 रोज मंगळवार सायंकाळी 4 वाजता पंचायत समिती सावली अंतर्गत ग्रामपंचायत जिबगांव येथे गावभेटीचा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमात प्रथम प्रभात फेरी काढुन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा प्रसार व प्रचार करुन नावीन्यपूर्ण उपक्रमास भेटी यामध्ये लोकसहभागातून सार्वजनिकसभागृह,स्मशानभूमी,निराधार गृह ,फळबाग, आदिना भेटी देऊन सेलीब्रेटी व प्रमुख अतिथीच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
वरील कार्यक्रम जिल्ह्य परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनात उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत,गट विकास अधिकारी व सहा.गट विकास अधिकारी,प्रशासक,ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कोमनवार प स सावली ग्रामपंचायत प्रशासक सरपंच पुरुषोत्तम चुदरी , उपसरपंच सौ मोनिका उडिरवाडे, सदस्य राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत अधिकारी श्रीरामे सर, यांनी केले आहे.



