ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जागतिक महिला दिनानिमित्त ग्रीन वारियर व युवा क्लबच्या वतीने स्वच्छता अभियान..

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : :जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सेमाना देवस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रीन वारियर आणि युवा क्लब यांच्या संयुक्त पुढाकारातून हा स्तुत्य उपक्रम राबवून परिसरातील कचरा हटवून देवस्थान परिसर चकाचक करण्यात आला.
सेमाना देवस्थान हे जिल्ह्यातील मुख्य पर्यटन व धार्मिक स्थळ असल्याने येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे परिसरात निर्माण होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला. या मोहिमेत सहभागी झालेल्या स्वच्छतामित्रांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले.या स्वच्छता अभियानाप्रसंगी नगर परिषद पाणी पुरवठा सभापती लिलाधर भरडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत बोरकुटे,डॉ. दीप बोदले , शिवणीचे सरपंच किरण ताटपल्लीवार,प्रा.राजेश कात्रटवार,प्रा.दिनेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर धकाते आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णा शेंडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वच्छतामित्रांचा उत्साह वाढवला व त्यांच्या कार्याचे गौरव केले.यावेळी स्वच्छता मित्र हर्षवर्धन मडावी, सुधीर मुनघाटे, मोहित समर्थ, मनोज उईके, मंथन लोळे,महेश धारणे, कुणाल गावतुरे,आदित्य कुद्रपावर, वैभव गेडाम,गौरव सेलोटे, आशिष दुर्गे,प्रणय सोनुले, वृषभ कुळमेथे रामकृष्ण कडते.तसेच महिला दिनाचे प्रतीक म्हणून संध्या मडावी, सपना हिचामी, ममता लेनगुरे यांनीही या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला.या उपक्रमातून ‘स्वच्छ गडचिरोली, सुंदर गडचिरोली’ असा संदेश देण्यात आला असून,भाविकांनी देखील परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन या ग्रीन वारीयारतर्फे करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.