▪️जीवाची पर्वा न करता महावितरणच्या जनमित्रांचे काम..
▪️महावितरणची कौतुकास्पद कामगिरी..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक 11/07/2025
महावितरणचे कर्मचारी दररोज जीवाची पर्वा न करता भर पावसातही जोखीम पत्करत काम सुरूच असते. जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक खोलगट भागात पाणी साचल्याने वीज पुरवठ्यास अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता युद्धपातळीवर काम करीत महावितरण कर्मचा-यांनी खंडित वीजपुरवठा काही तासांतच सुरळीत करीत ग्राहकांकडुन कौतुकाची पावती मिळविली.
गावाच्या भोवती पुराची परिस्थिती जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि त्या अशा अवस्थेत मानवाच्या गरजा पैकी निकट गरज असलेली म्हणजे विद्युत व्यवस्था. ती सुरू राहणार की नाही हा खूप मोठा ज्वलंत प्रश्न नागरिकांच्या मनात असतो. खरंतर त्यांनी लाईट येणारच नाही असे विचार त्यांच्या मनात असते. आणि नागरिक गृहीतही धरतात. कारण या एवढ्या पुराच्या पाण्यात जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर आपला जीव जोखमीत टाकून विद्युत पुरवठा सुरळीत करणार कोण ? असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत असतो..!
परिस्थिती कशीही असो महावितरणचे कर्मचारी अशाही परिस्थितीत नागरिकांना उजेडात कसं ठेवता येईल याचा काटोकाठ प्रयत्न करून पुराच्या परिस्थितीतही जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करतात. आणि अशीच ही घटना दोन दिवसांमध्ये गांगलवाडी वीज वितरण केंद्र येथे घडलेली आहे.
पुराच्या पाण्याखाली आलेल्या विद्युत व्यवस्थेला सुरळीत ठेवण्याच्या काम महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दि. ०९ आणि १० जुलै २०२५ रोजी पूर्ण केले. बोटीच्या सहाय्याने पुराच्या ठिकाणी जाऊन बंद झालेली विद्युत वाहिनी कट करून बाकी गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आले. महावितरण चे गांगलवाडी शाखाचे अधिकारी श्री दिनेश हनवते (सहाय्यक अभियंता), व कर्मचारी श्री. बोंडेजी मुख्य तंत्रज्ञ ,श्री राकेश मलोडे वरिष्ठ तंत्रज्ञ , श्री. आकाश नखाते वरिष्ठ यंत्रचालक, श्री बारेवाड यंत्रचलक, श्री रोहित करंजीकर तंत्रज्ञ, श्री. सूरज खोब्रागडे बाह्यस्त्रोत यंत्राचालक, श्री नागदेवते बाह्यस्त्रोत यंत्रचालक श्री. सचिन चहांदे बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ, व अन्य गंगालवाडी वीज वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मिळून विद्युत पुरवठा सुरळीत केले..
सलाम त्यांच्या कार्यास व त्यांच्या ध्येयास.