आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत राजुरा विधानसभेत पुन्हा २० किमी पाणंद रस्त्यांना मंजुरी!

▪️आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. २० मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत राजुरा विधानसभा मतदारसंघात पुन्हा २० किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. स्थानिक आमदार देवराव भोंगळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाली असून, या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राजुरा, कोरपना आणि गोंडपिपरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेतमालाची वाहतूक करणे आणि शेतीत ये-जा करणे अधिक सोयीचे होणार आहे.

स्थानिक आमदार देवराव भोंगळे यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या पाणंद रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या याच पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने या २० किलोमीटर लांबीच्या नवीन पाणंद रस्त्यांच्या कामांना हिरवी झेंडी दिली आहे.

या मंजुरीबद्दल आमदार देवराव भोंगळे यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस व महायुती सरकारचे तसेच राज्याचे रोजगार हमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांचे आभार मानले. रस्त्यांच्या या जाळ्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये राजुरा तालुक्यातील सातारी येथील बंडू मून यांचे शेत ते नदीकडे जाणारा पाणंद रस्ता, सोनापुर येथील सागर बल्की यांचे शेत ते उपरवाही कडे जाणारा पाणंद रस्ता, मारडा येथील वसंत देरकर ते रुपेश गोचरकर यांचे शेताकडे जाणारा पाणंद रस्ता, नोकारी खुर्द येथील कोंडय्या वंदनवार ते जामणीकडे जाणारा पाणंद रस्ता, इसापूर येथील विजय ठमके से तारू उरवते यांचे शेताकडे जाणारा पानंद रस्ता, खामोना येथील खामोना से बोडगांव व आर्वी ते सुमठाणाकडे जाणारा पाणंद रस्ता, धिडसी दत्तू ढोके से शंकर काकडे यांच्या शेताकडे जाणारा पाणंद रस्ता, टेंबूरवाही येशील बंडू निमकर ते कवठाळा रिठ कडे जाणार पाणंद रस्ता, पाचगांव येथील कोटकागुडा ते मंगी शिव कडे जाणारा पाणंद रस्ता तर कोरपना तालुक्यातील धानोली येथील सुनिल पवार ते प्रल्हाद पवार यांचे शेतापर्यंत पाणंद रस्ता, कुकूडसाथ ते कळमना कडे जाणारा पानंद रस्ता, दुर्गाडी येथील प्रमिलाबाई खडसे ते देविदास खडसे यांचे शेतापर्यंत जाणारा पाणंद रस्ता, लोणी येथील आदिवासी स्मशानभूमीत ते पारंबा कडे जाणारा पाणंद रस्ता, कोठोडा बुज. येथील निलकंठ खडसे ते मंगेश तंगडपल्लीवार यांचे शेतापर्यंत जाणारा पाणंद रस्ता आणि कन्हाळगांव ते कोरपनाकडे जाणारा पाणंद रस्ता, गोंडपिपरी तालुक्यातील कुडेसावली येथे ज्योती मोरे ते वर्धा नदीपर्यंत पाणंद रस्ता, परसोडी येथे कोंडवाडा ते निळकंठ मत्ते यांचे शेतापर्यंत पाणंद रस्ता, हिवरा येथे देवाजी चहारे ते नदीघाट पर्यंत पाणंद रस्ता, सकमुर येथील डोनू घुबडे ते शंकर कुचलवार यांचे शेतापर्यंत पाणंद रस्ता, तोहोगांव येथे देविदास रामटेके ते पांडुरंग धोटे यांचे शेतापर्यंत पाणंद रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे.
यामुळे गावांना थेट शेतांशी जोडणी मिळणार असून, नैसर्गिक आपत्ती किंवा पावसाळ्यामध्ये होणारी चिखलाची गैरसोय दूर होणार आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.