▪️चंद्रपुरात मोहा सडवा, देशी दारू 1.41 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त..

*🔸श्री. कुणाल गरगेलवार*
*🔸चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9356776439*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने आज दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी महाकाली कॉलरी, आनंदनगर येथे मोठी धडक कारवाई करत आठ महिलांविरुद्ध अवैध दारू विक्री विरूद्ध कारवाई करीत मोहा सडवा व देशी दारू असा एकूण 1,41,460 रुपये किमतीचा अवैध दारू साठा जप्त केला आहे.
चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की आनंदनगर येथील काही महिलांकडून त्यांच्याच घरी मोहा दारू तयार करून विक्री केली जात आहे. यावरून पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टीम, पंच, वजन माप अधिकारी आणि फोटोग्राफर यांच्यासह घटनास्थळी छापा Police Raid टाकण्यात आला.
यावेळी पोलिसांनी 8 महिलांना ताब्यात घेत मोहा दारू 485 लिटर, मोहा सडवा 1280 लिटर, दारू तयार करण्याचे साहित्य अंदाजे किंमत 42150 रुपये, देशी दारूच्या 34 शिश्या 1360 रुपये असा एकूण 141160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशन चे पो.नि. निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, नन्नावरे, पोउपनि. दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, परि.पोउपनि. मनिष तालेवार, वैभव चव्हाण, म.पो.हवा. भावना रामटेके, पो.हवा. सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, ईमरान शेख, निकेश ढेंगे, जावेद सिध्दीकी, मल्लेश नरगेवार, प्रविण रामटेके, कपुरचंद खरवार, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रूपेश पराते, मपोशि. सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केली.