आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

किल्लावार्ड भद्रावतीत पक्ष प्रवेश शिंदे साहेबांच्या जनसेवेवर मोहित होऊन कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

भद्रावती – ( इंडिया 24 न्युज ) : शहरातील किल्लावार्ड येथे आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. भाजप, शिवसेना (UBT) तसेच इतर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, जनसेवेचे प्रतीक मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या विकासदृष्टी, जनहितकारी कामगिरी आणि लोकाभिमुख धोरणांनी प्रभावित होऊन शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.

या पक्ष प्रवेश कार्यक्रमात शालू घनश्याम महेशकर, घनश्याम सखाराम महेशकर, मोहन मारगोवार, सचिन अशोक कत्तुरवार, गजानन महादेव उके तसेच असंख्य विविध पक्षांचे कार्यकर्ते भगव्या पताकेखाली एकत्र आले.

कार्यक्रमाला शिवसैनिक सुरज भाऊ शाहा यांच्या नेतृत्वाचा ठसा उमटला. त्यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या भगव्या पताकेखाली एकत्र येऊन जनतेची सेवा करण्याचा संकल्प केला. यावेळी युवा शिवसैनिक सुमित हस्तक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित शिवसैनिकांनी ठाम शब्दांत सांगितले की, “शिंदे साहेबांची विकासाची गती, जनतेशी असलेला थेट संपर्क व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तत्पर तोडगा हीच खरी राजकारणाची दिशा आहे आणि याचसाठी आम्ही शिवसेना (शिंदे गट) मध्ये आलो आहोत.”

किल्लावार्ड परिसरात झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक राजकीय समीकरणे हलून गेली असून, भविष्यात भद्रावती तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) आणखी बळकट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.