▪️रामनगर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार सुभाष सिडाम यांचे दुःखद निधन..

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज) : पोलीस स्टेशन रामनगर येथील सहायक फौजदार सुभाष सिडाम ( 56 ) कार्यरत होते यांचे नागपूर येथे उपचारदरम्यान निधन झाले. 21 ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर नागपूर येथे न्यू इरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होता. मात्र उपचार दरम्यान साथ न मिळाल्यामुळे आज 29 ऑगस्ट पहाटे 4 वाजता च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
सुभाष सिडाम हे कर्तवनिष्ठ मनमिळाऊ स्वभावाने ओळखले जात होते. त्यांनी पोलीस विभागात विविध ठिकाणी काम करताना अनेक जबाबदारी कर्तव्य केले आहे. सुभाष सिडाम यांची रामनगर पोलीस स्टेशन मध्ये बदली होण्यापूर्वी ते बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक तपासामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या निधनाने पोलीस विभागात व मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सुभाष सिडाम यांच्या परिवारात पत्नी, दोन मुले एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. अचानक झालेल्या या दुःखदय घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शौककळा पसरलेली आहे.
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो व या दुःखातून परिवाराला सावरण्याची शक्ती मिळो असे ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. माझ्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली देतो.

