▪️पोटेगाव- सावेला रस्त्यावरील प्रवास खड्डेमय रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा : प्रा प्रशांत देव्हारे

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
पोटेगाव – ( इंडिया 24 न्युज ) : पोटेगाव ते सावेला रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडेल असल्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. सदर रस्त्यावर वाहतूक करताना जिकिरीचं सामना करावा लागत असल्यामुळे रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा प्रशांत देव्हारे यांनी केली आहे.
गडचिरोली वरून पोटगाव २५ ते ३० किमी अंतरावर असून गाव परिसरात जवळपास २५ गावे जोडली असून, सदर रस्ता गडचिरोली वरून पोटेगाव पावीमुरांडा ते घोट असा मार्ग आहे पोटेगाव ते सावेला मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्यामुळे परिसरातील नागरिकांसाठी दमछाक देणारा ठरत आहे. गडचिरोली हे तालुका व जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे परिसरातील नागरिकांना शासकीय कामाकरिता गडचिरोली येजा करावे लागते तसेच परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याकरिता गडचिरोली येथे जात असतात मात्र मागील एक वर्षापासून पोटेगाव ते सावेला मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे . मात्र याकडे वरिष्ठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. क्षेत्रातील आमदारांनी गांभीर्याने लक्ष घालून संबंधित विभागाला सूचना देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे जेणेकरून परिसरातील नागरिकांना जीव घेण्या प्रवासातून सुटका मिळेल.
सदर रस्त्याचे दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. असा इशारा वंचित बहुजन आघाडी गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे , सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नरोटे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर मुंजामकर व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

