▪️महात्मा फुले युवा दल जिल्हा उपप्रमुखपदी रवींद्र तायडे यांची निवड.

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
अकोला – ( इंडिया 24 न्युज ) : दानापूर येथील उत्साही व जनसंपर्कात निपुण असलेले सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पुंडलिकराव तायडे यांची महात्मा फुले युवा दल अकोला जिल्हाउपप्रमुख पदी निवड झाल्याने जिल्हाभरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.ही निवड महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख ॲड. सतीशजी शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली. आपल्या या सन्माननीय निवडीचे श्रेय ॲड. शिंदे साहेबांना देतात व त्यांचे धन्यवाद मानतात.रवींद्र तायडे यांनी सामाजिक कार्य अधिक जोमाने व निष्ठेने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.रवींद्र तायडे यांनी आजवर अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करून स्वतः ठसा उमटवला आहे. ते अखिल भारतीय माळी महासंघ युवक आघाडी तेल्हारा तालुकाध्यक्ष, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास तालुका कार्याध्यक्ष, तसेच भाजप प्रणित कामगार आघाडी तालुकाध्यक्ष आणि ओबीसी आघाडी तालुका उपाध्यक्ष या पदांवर कार्यरत राहिले आहेत. सध्या ते ग्रामपंचायत सदस्य, दानापूर या नात्याने तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांची सेवा करत आहेत.
युवकांना एकत्र आणून समाजकारणाची दिशा दाखविण्याचे कार्य त्यांनी नेहमीच पुढाकाराने केले आहे. त्यांच्या कार्यामुळे तालुका व जिल्ह्यातील सामाजिक संघटनांमध्ये त्यांचा प्रभावी चाहता वर्ग आहे.त्यांच्या नियुक्तीची बातमी समजताच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.



