आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मॅजिक बस फाउंडेशन तर्फे शिवानी विद्यालयात पोषण महासप्ताह कार्यक्रम..

 

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

कुनघाडा रै : ( इंडिया 24 न्युज ) – शिवानी माध्यमिक विद्यालय नवेगाव रै येथे मॅजिक बस फाउंडेशनच्या वतीने पोषण महासप्ताह कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत मुनगेलवार हे होते, उद्घाटन ज्येष्ठ शिक्षक मिलिंद उराडे यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक पराग दडवे, मिलिंद उराडे, अरविंद कापगते, मंगेश वासेकर, प्रमोद कुनघाडकर, शिक्षकेत्तर कर्मचारी रमेश होकम, खेमाजी धुडसे, राहुल बोम्मावार, किशोर भोयर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी अन्न व पोषण रिले या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांमधून पोषणाचे महत्व जाणून जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. तसेच दोन संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या सत्रात किशोरवयीन मुलींसाठी पोषणाची गरज या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येऊन मुलींच्या शारीरिक व पौष्टिक गरजांवर प्रकाश टाकण्यात आला. दुसऱ्या सत्रात आरोग्यासाठी पोषणाची गरज या विषयावर मार्गदर्शन करण्यात येऊन, मानसिक स्वास्थ्यासाठी संतुलित आहाराचे महत्व पटवून देण्यात आले. मॅजिक बस फाउंडेशनच्या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये पोषण आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली. उपक्रमाचे आयोजन वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात तालुका समन्वयक योगिता सातपुते, आकाश डोंगरे, युवा मार्गदर्शक पंकज शंभरकर यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार पंकज शंभर यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.