▪️स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली मोठी कारवाई..
▪️पेंट व ईलेक्ट्रीक साहित्याची चोरी करणाऱ्या चोराला ठोकल्या बिड्या..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने LCB केलेल्या कारवाईत दोन रेकॉर्डवरील आरोपींकडून घरफोडी करून चोरी करणाऱ्या दोघांना अटक करीत पेंट व ईलेक्ट्रीक साहित्यांसह ३,३८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी पडोली पोलीस ठाण्यात फिर्यादी रामप्रवेश धिरज ठाकुर (वय ५४, रा. महाकाली नगरी २, देवाडा, पडोली) यांच्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्या नवीन घराच्या बांधकामासाठी लागणारे पेंटचे डबे व ईलेक्ट्रीक साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पथक गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शादाब शब्बीर सैफी (२९), सोहेल कादीर सय्यद (२८), दोघे रा. नेरी वार्ड, दुर्गापूर हे आरोपी चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी फिरत आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता घरफोडी प्रकरण उघड झाले. आरोपींकडून चोरीसाठी वापरलेले ऑटो रिक्षा, दुचाकी, पेंट व ईलेक्ट्रीक साहित्य असा एकूण ३,३८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना पडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अमोल काचोरे, सपोनि. दिपक कांक्रेडवार, पोउपनि. विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सुनिल गौरकार, तसेच पोहवा. सुभाष गोहोकार, रजनीकांत पुष्ठावार, सतिश अवथरे, दिपक डोंगरे, इमरान खान, पो.अं. किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार व चापोअं. मिलींद टेकाम यांनी केली.



