आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शेती व पर्यटन संशोधनातून प्रेमकुमार उपरे यांना पी. एच. डी. पदवी

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे चंद्रपूरचे उद्योजक प्रेमकुमार अशोक उपरे यांना वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेअंतर्गत ‘व्यवसाय व्यवस्थापन व प्रशासन’ या विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.

त्यांनी डॉ. जी. एफ. सूर्या, प्राचार्य, रिनासंस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केले.
“Impact of Agritourism on Economic Empowerment of Farmers: A Case study on Farmers of Chandrapur District.” हा त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय होता

पर्यटनाशी निगडीत शेतीच्या नव्या संधी व त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण या विषयावर त्यांनी केलेले संशोधन उच्च दर्जाचे ठरले आहे.
सध्या ते उपरे अॅग्रो इंटरप्रायजेस चे प्रोप्रायटर असून, ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांना नवे मार्ग दाखविण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कृषी क्षेत्रासह शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.