आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयींची घेतली दखल..

▪️जिल्हा शल्य चिकित्सकांना पाहणी करून रुग्णांची गैरसोय टाळण्याचे दिले स्पष्ट निर्देश..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यतत्परतेचे आणखी एक उदाहरण नागरिकांनी बघितले. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सगळे व्यस्त आहेत. स्वतः आमदार श्री. मुनगंटीवार देखील विविध मंडळांना भेटी देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेत आहेत. पण या आनंदात आणि उत्सवाच्या वातावरणातही त्यांनी रुग्णांच्या गैरसोयीची तातडीने दखल घेतली. मुल उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीच्या तक्रारी प्राप्त होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सगळी कामे सोडून पहिले प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शल्य चिकित्सकांनी रुग्णालयात पोहोचून पाहणी केली व वैद्यकीय अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.

आमदार श्री. मुनगंटीवार यांनी जनसेवा हिच ईश्वरसेवा मानली आहे. त्यामुळे कुठल्याही कामांच्या, कार्यक्रमांच्या आधी जनहिताच्या कामांना ते प्राधान्य देत असतात. अशाच पद्धतीने त्यांच्याकडे मुल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या या तक्रारींची दखल घेत त्यांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शल्य चिकित्सकांना पत्र लिहून कार्यवाहीचे निर्देश दिले.

मुल उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनी विविध तक्रारी आ. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे दिल्या होत्या. जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र लिहून आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष घालण्यास सांगितले. ‘मुल उपजिल्हा रुग्णालयामध्ये विविध आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी माझ्या जनसंपर्क कार्यालयात प्राप्त झालेल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची/कर्मचार्‍यांची अनुपस्थिती, रुग्णांशी असभ्य वर्तन, योग्य प्रकारे विचारपूस न करणे, औषधोपचाराचा तुटवडा तसेच नियमित आणि कंत्राटी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांना होणारी गैरसोय या सर्व बाबींवर योग्य कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

यासंदर्भात स्वतः उपजिल्हा रूग्णालय मुल येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व वरील तक्रारींची पुनरावृत्ती होणार नाही याची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही आ. श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले. त्यानंतर शल्य चिकित्सकांनी पाहणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांची गैरसोय टाळण्याचे निर्देश दिले. यावेळी मुल येथील भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.