▪️तालुका स्तरीय शालेय कराटे स्पर्धेत यझान शेख व शुभ्र बसारकर तालुक्यात प्रथम..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : क्रिडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र शासन पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने तालुका स्तरीय विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चामोर्शी तालुक्यातील महात्मा फुले हायस्कूल येथे सुरू असलेल्या क्रिडा स्पर्धेत डिस्नीलॅण्ड ॲन्ड प्रेसिडेन्सी इंग्लिश मिडियम स्कूल चामोर्शी येथील विद्यार्थी यझान अयाझ शेख याने वयोगट १४ ते १९ (मुले) व शुभ्र सारंगधर बसारकर (मुली) गटातून कराटे स्पर्धेत उत्कृष्ट पराक्रम लढवुन विक्रमाचा सर पार करीत चामोर्शी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांची जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धेकरीता निवड झाली आहे.दोन्ही कराटे पट्टूनी आपल्या यशाचे श्रेय आई – वडील, शाळेचे मुख्याध्यापक जे.विलास व कराटे प्रशिक्षक मार्गदर्शक यांना दिले आहे. विजेत्या स्पर्धकांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दोन्ही विर कराटे पटूंचे शाळेचे मुख्याध्यापक तथा संचालक जे.विलास व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.



