आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर रहमत नगर परिसरात क्लोरिन गॅस गळतीची घटना..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : आज दुपारी फायर कंट्रोल रुमकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या रहेमत नगर पाणी शुध्दीकरण केंद्रावर क्लोरिन गॅस गळती झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. गळतीचे प्रमाण लक्षात घेत जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व महानगरपालिका यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. प्रशासनाने तत्परता दाखवत त्या परिसरातील प्रभावित घरातील सदस्यांना ताबडतोब सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके, अग्निशमन दल तसेच वैद्यकीय यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांसाठी सूचना :
इरई नदी काठावरील तसेच रहमान नगर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत.
श्वसनास त्रास होणाऱ्या, वृद्ध व लहान मुलांना तातडीने सुरक्षित व स्वच्छ ठिकाणी हलवावे.
गळतीग्रस्त भागाजवळील नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करावी.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस व महानगरपालिका यंत्रणा घटनास्थळी मदत कार्य हाती घेत असून नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना शांत राहून पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.