ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️गडचिरोली, चामोर्शी रोडवर पोहर नदीवरील पुलावर कामा अभावी खराब रस्त्यामुळे जवळपास 5 किलोमिटर ट्रॅफिक जॅम..

▪️प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेला, शालेय विद्यार्थ्यांना व अनेक रूग्णांना त्रास सहन करावे लागत..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

गडचिरोली / चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जर अशाप्रकारे प्रशासनाच्या व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे जर सर्वसामान्य जनतेला त्रास झाल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर दंडणीय कारवाई सह फौजदारी कार्यवाही करण्याचे ठरले असतांना कोणाच्या मेहरबानीमुळे अशाप्रकारची परस्थिती निर्माण होत आहे व वारंवार तक्रारी व आंदोलने करून सुद्धा यांची का दखल घेण्यात येत नाही. असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या वतीने करण्यात येत आहे व जनतेत मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.