आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चकपीरंजी ग्रामपंचायतीत बोगस मजूर दाखवून आर्थिक गैरव्यवहार : पत्रकार परिषदेत गावकऱ्यांची मागणी..

▪️चौकशी अहवालात सरपंच, विद्यमान व तत्कालीन ग्रामसेवकांवर कसूर केल्याचा ठपका..

 


राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

सावली – ( इंडिया 24 न्युज ) : चकपिरंजी ग्रामपंचायत मधील अफरातफरीची रक्कम जवळपास १ लाख ६०० रु सरपंच व ग्रामसेवकांकडून वसूल करण्याची जिल्हा परिषदेकडे शिफारस
सावली – चकपीरंजी ग्रामपंचायतमधील वेगवेगळ्या बांधकामाच्या कामावर पदाधिकाऱ्यांच्या जवळील व मित्र यांना बोगस मजूर दाखवणे, एकाच दिवशी एकच मजूर वेगवेगळ्या कामावर दाखवणे, मजूर नोंदवहीत खोटे सह्या करणे या बाबी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत आढळल्याने विद्यमान व तत्कालीन ग्रामसेवकांनी कामात कसूर केल्याने कारवाई करण्याबाबत, अफरातफरीची रक्कम सरपंच व ग्रामसेवकांकडून समप्रमाणात वसूल करणे, ग्रामपंचायत पदाधिरी यांनी स्वतः व जवळील व मित्र यांच्या नावाने मजुरीची रक्कम उचल केल्याने त्यांचेवर अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ माजली असून रकमेसहीत फौजदारी करण्यात यावी अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन प्रफुल निरुडवार,संदीप भडके, पूजा भडके, अंजली सुभाष चौधरी,चैताली येलेट्टीवार, लक्ष्मण झीटू मंडरे तंटामुक्ती अध्यक्ष यांनी केलीआहे.
चकपिरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांनी ग्रामपंचायत चकपीरंजी येथे ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत पदाधिकारी शासनाची फसवणूक करीत असल्याची तक्रार केली. त्यानुषगाने चौकशी केली असता शासकीय निधीची अफरातफर केल्याचे चौकशीत आढळल्याने पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पुढिल कारवाईची शिफारस केली आहे. शिफारशीत ग्रामपंचायत सदस्य वेणुदास मडावी यांची पत्नी मीना वेणुदास मडावी व उपसरपंच अरविंद भैसारे यांची पत्नी सुवर्णा अरविंद भैसारे हया ग्रामपंचायतीचे कामावर असल्याने व पती-पत्नी एकत्र राहत असल्याने त्याचे एकमेकाचे उत्पन्नात हीत संबध असल्याने वेणूदास मडावी व अरविंद जगन्नाथ भैसारे हे ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ग) नुसार अपात्र ठरतात. अतुल चौधरी, सशांक भोयर, रूषीदेव कोलते, सुवर्णा भैसारे, चित्रगंधा चौधरी, जगन भैसारे, युवराज पेंदाम, वैशाली कोलते, भगवान लाडे यांना एकाच दिवशी वेगवेगळ्या कामावर दाखवून व बनावट स्वाक्षरी करून जवळपास १ लाख ६०० रू. रक्कमेची अफरातफर केल्याने सरपंच व ग्रामसेवकांकडून समप्रमाणात रक्कम वसुल करणे, विद्यमान सरपंच श्रीमती उषा रजनीकांत गेडाम व विद्यमान ग्रामसेवक दयानंद खोब्रागडे व तत्कालीन ग्रामसेविका भावना भानारकर यांनी बोगस मजूर दाखवून व एकच मजूर दोन कामावर दाखवून कसूर केल्याने त्यांचेवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आलेला आहे.अशी माहिती प्रफुल निरुडवार,संदीप भडके, पूजा भडके, अंजली चौधरी,चैताली येलेट्टीवार, लक्ष्मण मडरे,तंटामुक्ती अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

🔸माझे बयान:- ▪️अभिप्राय : मान. असीम गुप्ता सचिव, महाराष्ट्र शासन यांचा शासन परिपत्रक दि.४ जानेवारी २०१७ नुसार अपहार केलेली रक्कम वसूल करून जबाबदार तत्कालीन व विद्यमान ग्रामसेवक सरपंच, उपसरपंच, सदस्य, बनावट मजूर यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करून तत्कालीन व विद्यमान ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात यावे. सदर कारवाई लोकशाही पद्धतीने नझाल्यास ग्रामस्थांना घेऊन आंदोलन व आमरण उपोषण करणार उपोषणादरम्यान काही जीवित हानी झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. प्रफुल सुरेश निरूडवार
सामाजिक युवा कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्यकर्ता संपर्कप्रमुख सावली तालुका

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.