▪️मधमाशी पालन कार्यशाळा आणि शिळींब विविध विकास सोसायटी निवडणूक उत्साहात संपन्न..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
मावळ – ( इंडिया 24 न्युज ) : शिळींब गावात विविध विकास सोसायटी निवडणूक उत्साहात पार पडली, पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीचे औचित्य साधत शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त मधमाशी पालन मार्गदर्शन यावेळी ठेवण्यात आले. या कार्यक्रमाला शिळींब आजिवली जवन कादव वाघेश्वर तुंग मोरवे चावसर काळेचाफसर बोढशेळ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून रूस्तुम ए हिंद महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल भाऊ बुचडे, श्री संभाजीराव शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती मावळ तालुका सभापती, विलास मालपोटे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, नामदेवराव ठुले खरेदी-विक्री संघ माजी चेअरमन, ज्ञानेश्वर निंबळे खरेदी-विक्री संघ संचालक शहाजीराव कडु खरेदी विक्री संघ संचालक पैलवान चंद्रकांत शिंदे महाराष्ट्र राज्य स्पीड बॉल पुणे जिल्हा अध्यक्ष, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे भावी सदस्य पैलवान धीरज गरवड, दिव्यांग सेलचे मावळ तालुका अध्यक्ष सुभाष शेडगे, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत कदम, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग प्रदेश सरचिटणीस महेंद्रजी शेलार, मावळ तालुका उपाध्यक्ष उमेश रटाटे उपस्थित होते तर मधमाशी पालन कार्यक्रमाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग विभाग प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत आपटे यांनी उपस्थिततांना मधमाशी पालनाचे महत्त्व, मधमाशीचे प्रकार, मधमाशी पालनाची गरज आणि व्यावसायिक फायदे याविषयी माहिती देत, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मधु क्रांतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच मावळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये अशा प्रकारचे मधमाशी पालन प्रशिक्षण पूर्व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्याचे आवाहन करताना ज्यांना मधमाशी पालन प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यांना आयोजक श्री बाजीराव ढमाले यांच्याकडे नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या आयोजक माननीय सौ सारिका ताई बाजीराव ढमाले पुणे जिल्हा सरचिटणीस दिव्यांग सेल राष्ट्रवादी काँग्रेस व श्री बाजीराव ढमाले दिव्यांग सेल यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला वर्ग देखील उपस्थित राहिला. मधमाशी पालन मार्गदर्शन झाल्यानंतर शिळींब विविध विकास सोसायटीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली. यावेळी चेअरमन पदी श्री शहाजीराव आनंदराव शिंदे तर तज्ञ संचालक म्हणून श्री संदीप मारुती शिंदे तसेच व्हॉइस चेअरमन पदी अंकुशराव चोरगे यांच्या नवनियुक्तीची घोषणा करण्यात आली. या निवडीला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माजी चेअरमन जालिंदर भाऊ ढमाले, तसेच माजी सरपंच किसनराव धनवे, अंकुशराव धनवे, सामाजिक कार्यकर्ते भरत धनवे, राजु धनवे, शहाजीराव कडू माजी चेअरमन प्रकाश धनवे माझी चेअरमन जालिंदर ढमाले अंकुशराव धनवे किसनराव धनवे सरपंच माजी सामाजिक कार्यकर्ते भरत धनवे, राजू धनवे, दत्तात्रय कडू सर, गणेश शिंदे, लहू धनवे, मल्हारी आखाडे, सतीश काळे, उद्योजक प्रदिप ढमाले, उद्योजक अनिलराव ढमाले उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी आनंदराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिळींब कार्यकारी विविध विकास सोसायटीच्या माजी चेअरमन यांनी ज्याप्रमाणे पारदर्शकपणे काम केले आणि चेअरमन पदाचा लौकिक वाढवला त्याप्रमाणे नवनियुक्त पदाधिकारी देखील तशीच गौरवपूर्ण कामगिरी करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. संचालक विलास मालपोटे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले, जिल्हा परिषदचे भावी उमेदवार पैलवान धीरज गरवड यांनी ग्रामीण तरुणांनी स्वबळावर उद्योग व्यवसाय करून कशाप्रकारे यशस्वी होता येऊ शकतं हा स्वतःचा आदर्श तरुणांपुढे ठेवला त्याचप्रमाणे निवडणूक ही प्रसिद्धीसाठी पैसा कमावण्यासाठी लढवणार नसून लोकांची सेवा करण्यासाठी लढवणार आहोत असे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आणि अध्यक्ष रुस्तुम ए हिंद महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल भाऊ बुचडे यांनी ग्रामीण भागातील जनजीवन हे वैशिष्ट्यपूर्ण आहे असे सांगताना पैलवान होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांना कायम मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. तसेच मधमाशी ही पृथ्वी वर चार दिवस नसेल तर पृथ्वीवरील जनजीवन नष्ट होईल ही अभिजीत आपटे यांनी सांगितलेली बाब अधोरेखित केली. शेती उत्पादन वाढ आणि शेतीला जोड व्यवसाय तसेच पर्यावरण संरक्षणासाठी अभिजीत आपटे यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे महत्त्व ओळखण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. तसेच शिळींब विविध विकास सोसायटी च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.



