आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जागृत ग्राहक राजा तर्फे विद्यार्थी ग्राहक जागरुकता कार्यक्रम संपन्न..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : विद्यार्थी शाळेत विद्या ग्रहण करण्यासाठी येतात. आईवडिलांना तो विश्वास असतो,हा विश्वास मोडल्या जाणार नाही, आणि कुणाच्याही भुलथापांना बळी न पडता अनावश्यक बाबींना नाही म्हणायला शिका असे परखड मत पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी विद्यार्थी जागरुकता कार्यक्रमाचे निमित्ताने पोक्सो कायदा व विद्यार्थी सुव्यवस्था याबाबत सविस्तर माहिती देताना व्यक्त केले आणि आपल्या कर्तव्याचे भान राखण्याची आवश्यकता विषद केली.
दीपक देशपांडे यांनी, विद्यार्थी हा ग्राहकच आहे त्यामुळे आज या विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली असून ग्राहक म्हणून असणाऱ्या अधिकारांची जाणीव व्हावी व आपली शारिरीक, मानसिक आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी आपल्या अधिकारांची माहिती करून देण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून ग्राहक म्हणून फसवणूक टाळण्यासाठी वस्तू खरेदी करताना त्या वस्तूची किंमत, उत्पादन तारीख आणि वापराची अंतिम तारीख बघून खरेदी करण्याचे व वस्तू खरेदी करताना पावती मागण्याची सवय लावण्याचे आवाहन केले.
आज दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी नवभारत विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मूल येथे ग्राहक जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवभारत विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक झाडे , प्रमुख अतिथी म्हणून मूल पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम,जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत अध्यक्ष श्री.दीपक देशपांडे, जागृत ग्राहक राजा चे मूल तालुका सचिव श्री रमेश डांगरे , जागृत ग्राहक राजा चे प्रमोद मशाखेत्री, रजनी झाडे ,तारका खोब्रागडे, पर्यवेक्षिका वर्षा भांडारकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
क्रीडा क्षेत्रात उज्वल यश मिळवलेल्या व राज्यस्तरावर गेलेल्या विद्यार्थ्यांचा याप्रसंगी मंचावर उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अशोक झाडे यांनी विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा त्याची व्याप्ती आणि ग्राहक संरक्षण कायदा व आपल्या हक्कासाठी जागरुकता बाळगण्याची आवश्यकता कां व कशी आहे, आणि आपली फसवणूक कशाप्रकारे होऊ शकते याबाबत सविस्तर आढावा घेताना विद्यार्थ्यांना सजगपणे व्यवहार करण्याची सुचना केली व एक सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या पदाधिकारी यांचे अभिनंदन करीत आभार मानले.या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताराचंद निमसरकार यांनी तर प्रास्ताविक रमेश डांगरे सचिव जागृत ग्राहक राजा आणि आभार प्रदर्शन दिपा गोंगल मॅडम यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी, विजय मेश्राम, प्रतिमा उमक, विकास मोडक, निलेश माथनकर, राजू बोढे, विजय निखारे, पुनमचंद वाळके, माधुरी तलांडे, चैतन्य पुप्पलवार , सुनिल चौधरी, उदय चौधरी, भारत सलाम तसेच विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.