आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस आणि सायबर फ्रॉड कार्यक्रमाचे चे यशस्वी आयोजन..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक 24/9/2025 रोजी सर्वोदय शिक्षण मंडळ अंतर्गत शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतिने दिनांक 17 सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 2025 पंधरवाडा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एजाज शेख सर यांनी कम्प्युटर द्वारा होणारे फ्रॉड बद्दल विद्यार्थ्यांनी सांभाळून राहावे,जागृत राहावे म्हणून यासाठी स्पेशल सायबर फ्रॉड या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी चंद्रपूर सायबर सेल चे प्रमुख मुजावर युसुफ अली सर यांना निमंत्रित केले.
24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजनेचे स्थापना दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येते . या दिवसाचे अवचित्य साधून माजी एनएसएस प्रमुख सरोज कुमार दत्ता सर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्थापना दिवस आणि त्याचे महत्त्व या विषयी बोलताना आपला मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की आपण स्वतः चांगल्या प्रमाणे जगतो, सगळे जगतात,कुत्री मांजर पण जगतात परंतु राष्ट्रीय सेवा योजनांमध्ये स्वतःसाठी न जगता दुसऱ्यांसाठी जगा हा संदेश त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. नोट फॉर मी बट फॉर यू असा संदेश त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासोबतच एनएसएस लोगो मधील वेगवेगळे रंग आणि त्याचे विशेष महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या सर्व गुण विकसित करण्यासाठी एनएसएस एक माध्यम आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास हे एनएसएसच्या माध्यमाने होऊ शकते आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे विकास झालेला आहे, आणि होत आहे असे ते आपल्या मार्गदर्शन पर भाषणात बोलले.
मुजावर युसुफ अली सर हे आपल्या व्यस्त दिनचर्या सांभाळून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विधी महाविद्यालयात आले, सायबर सेल चे प्रमुख असताना त्यांच्यासमोर कोणकोणते प्रकारचे केसेस आले आणि त्यांचा उलगडा ते कशा प्रकारे यशस्वीपणे सायबर फ्रॉडचे क्रिमिनल्स तांत्रिकदृष्ट्या त्यांनी कसे पकडले याबद्दल,त्यांनी सविस्तर स्पष्ट केले .त्यांनी आपल्या सोबत पावर पॉइंट प्रेझेंटेशन आणली होती आणि त्या द्वारा त्यांनी विद्यार्थ्यांना इंस्टाग्राम मधील सेटिंग कशी असावी? वायफाय पासून कसे वाचावे? बाथरूम मध्ये लाईट नसताना मोबाईलचा कॅमेरा मोबाईलचा फ्लॅश लाईट ऑन करून गेले असता, तरीसुद्धा कशाप्रकारे मोबाईल आपले खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि त्यापासून आपण कसे सावध राहावे हे खूपच प्रभावीपणे त्यांनी स्पष्ट केले. लाईन गेले असताना फक्त प्रकाशासाठी फ्लॅश लाईट लावले तरी सुद्धा कॅमेरा कसा ऑन होतो आणि आपले व्हिडिओ कसे रेकॉर्ड करतात हे त्यांनी स्पष्ट केले आणि त्यापासून आपण कसे सावध राहावे आणि सुरक्षित रहावे याबद्दल त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर लीना लंगडे मॅडम यांनी यशस्वीपणे पार पाडले आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख नंदकिशोर भंडारी यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.