विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळ ( नियोजित) अधिन विघ्नहर्ता स्पोर्ट क्लब अध्यक्षपदी पवन साळुंखे यांची बिनविरोध निवड सत्कार समारंभ संपन्न

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी
शिरढोण : (इंडिया 24 न्यूज )ठाणे जिल्ह्यातील व कल्याण तालुक्यातील मौजे शिरढोण येथे
म्हाडा वसाहत दिनांक 17/11/2025 रोजी मंडळाच्या अधिपत्याखाली भगवान पोपळे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. मागील वर्षभराच्या कालावधीत मंडळाच्या कार्यकारणी समिती ने अनेक विविध कामे यशस्वी रित्या पार पाडली. पुढे येणारे सर्व कार्यक्रम साजरे करण्याचा महत्तवपूर्ण निर्णय या कार्यकारणी समितीने घेतला. तसेच जे नवीन सभासद झालेत त्या सभासदांनि मंडळामध्ये प्रस्ताव मांडला विघ्नहर्ता स्पोर्ट क्लब करण्याचा निर्णय घेण्याचं भाग्य पाडले. नवनिर्वाचित समितीला गठीत करण्यात आली . सभा यशस्वी रित्या संपन्न झाली

. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने सदस्यांनी सहभाग घेतला व उपस्थित दर्शवली.या प्रसंगी मंडळाचे आधारस्तंभ सुबोध सावंत कार्याध्यक्ष गणेश यावलकर सचिव गणेश पारेकर खजिनदार गणेश महाजन नारायण भोसले रोहित कारभारी रवी चौगुले शिवराज दुवे साहेबा झिंगरे अभिषेक मगर गणेश वाटे अजिंक्य वडगणे ऋषिकेश देशमुख गणेश मोरे उदय पुणेकर दिनेश नगमे दिनेश पवार संदीप कदम
आज दिनांक 17/11/2025 रोजी झालेल्या बैठकी मध्ये विघ्नहर्ता स्पोर्ट क्लब नविन कार्यकारणी समितीची निवड पुढील तीन वर्षां करीता
सर्वानुमते करण्यात आली.नविन नियुक्त केलेली कार्यकारणी समिती पुढील प्रमाणे….

अध्यक्ष:-पवन साळुंखे
उपाध्यक्ष:- अमोल कुळवेकर
खजिनदार:- भितेश पवार
मार्गदर्शक :- किरण गायकवाड
नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. पवन साळुंखे यांनी पदभार स्वीकारला आणि आपल्या कार्यकारणी समितीला संबोधित केले.पुढील तीन वर्ष हि आपल्या विघ्नहर्ता स्पोर्ट क्लब यशस्वी आणि प्रगती च्या वाटचालीची असतील अशी ग्वाही दिली.उपस्थित असणाऱ्या सर्व सभासदांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.



