आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️फवारणीचे औषध खरेदी करून येत असताना ट्रकला धडक दोन युवकांचा मृत्यू..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) :सध्या शेतात कापूस धान पिकांवर औषधी फवारणीचे दिवस आहेत. करिता दोन युवक शेतकरी औषध खरेदी करून पोंभुर्णा येथून पेंढरी मक्ता कडे दुचाकीने येत असतांना जुनासूर्ला गावाच्या हद्दीत ट्रकने दुचाकी धारकांना धडक दिल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाल्याने चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील युवक कापसाला फवारणीचे औषध खरेदी करून मोटरसायकलने गोंडपिपरी खेडी मार्गे येत असतांना पोलीस स्टेशन मुल अंतर्गत जुनासूर्ला गावाच्या हद्दीत ट्रकने दुचाकी स्वारकाना उडविले. ही घटना दुपारी २.३० च्या सुमारास घडली असून या अपघातात सारंग गंडाटे (वय २६) रा. पेंढरी मक्ता याचा जागीच मृत्यू झाला तर प्रियांशु गंडाटे (वय २३) रा. पेंढरी मक्ता याचा मुल उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर लंकेश समर्थ रा. मुंडाळा हा जखमी असून चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.