आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नवेगाव माल – फोकुर्डी मार्गावरील पूल धोकादायक.. प्रशासनाचे दुर्लक्ष..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील नवेगाव माल-फोकूर्डी मार्गावर मायनर पूल असून तो जीर्ण झाल्यामुळे धोकादायक ठरत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
अंदाजे ५० वर्षांपूर्वी शेतीच्या मध्यभागातून मायनर गेला आहे. याठिकाणी नागरिकांची गरज लक्षात घेऊन पूल तयार करण्यात आला होता.त्याच पुलावरून गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक व वाहनधारक जात असतात पुलाजवळ रस्ता वळण आहे .पुलाच्या मध्यभागी मोठा खड्डा असून पावसाचे पडलेले पाणी खड्ड्यात साचून राहत असते .साचलेल्या पाण्यातून नागरिक ,विद्यार्थी ये जा करीत असतात .ही समस्या अनेकदा या भागातील नागरिकांनी संबधित अधिकाऱ्यांना दिली.मात्र अर्ध शतक होऊनही या मार्गावर असलेला पूल होऊ नये हे दुर्दैवच शेजारी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जाण्यासाठी याच मार्गाने मुख्य मार्ग जोडलेला आहे या मार्गावरून दररोज वीस गावातील नागरिक ये जा करीत असतात.मात्र पुलाची अव्स्था बिकट असताना सुद्धा पुलावरून ये जा करीत असून मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.