▪️लोकाभिमुख विकासासाठी भाजप हाच एकमेव पर्याय : आमदार देवराव भोंगळे

*🔸सौ शिल्पा बनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दमपूर मोहदा व शेडवाही येथील काँग्रेसच्या सरपंच व उपसरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश
जिवती: लोकाभिमुख विकास, पारदर्शक प्रशासन व जनता-हिताचे निर्णय हेच भाजपचे ब्रीद असून, जनतेच्या हितासाठी लोककल्याणकारी योजना राबवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी भाजपा सदैव कटिबद्ध असल्याचे मत आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले.
जिवती तालुक्यातील दमपूर मोहदा व शेडवाही येथील काँग्रेस पक्षातील सरपंच व उपसरपंचासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिवती येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना आमदार भोंगळे म्हणाले , जनतेचा विश्वास संपादन करणे, सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणे आणि गावपातळीवर मूलभूत सुविधा पोहोचवणे, हेच माझे उद्दिष्ट आहे. भाजप हा विकासाभिमुख विचारसरणीचा पक्ष असून, अधिकाधिक लोकांचा पाठिंबा मिळत असल्याचे प्रतिपादन त्यांनी कार्यकर्त्यांच्या भाजपात जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमात केले. यावेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये दमपूर मोहदा येथील सरपंच नारायण वाघमारे, ग्राम पंचायत सदस्य रेणुका हारगेवार, पर्वताबाई मडावी, भागवत वाघमारे, तसेच शेडवाही येथील सरपंच चित्रु सिडाम यांचेसह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, भाजपाचे जिवती तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, शहराध्यक्ष राजेश राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी , महामंत्री,तुकाराम वारलवाड, गोविंद टोकरे ,भीमराव पवार, पुडलिक गिरमाजी, चंद्रकांत घोडके, दिगांबर आंबटवाड, अंबादास कंचकटले , आंनद कदम, अजय खंडारे, वाघमारे, चंद्रभान केदासे, सुनीता नामेवाड यांचेसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



