आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी शासन आदेश जारी करण्याची सकल धनगर जमात चंद्रपूर जिल्ह्याची मागणी..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : सकल धनगर जमात चंद्रपूर जिल्हा तर्फे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन मा. जिल्हाअधिकारी यांच्यामार्फत सादर करण्यात आले.

या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक 36 मध्ये असलेली “धनगड (Dhangad)” ही नोंद ही प्रत्यक्षात अस्तित्वात नसून महाराष्ट्र राज्यात केवळ “धनगर (Dhangar)” ही जमातच अस्तित्वात आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल प्रकरण क्रमांक 4919/2017 मध्ये देखील राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे हे मान्य केले आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षण यादीत प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेल्या जमातीचे नाव असणे हे संविधानविरोधी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

धनगर जमात ही महाराष्ट्रातील स्वतंत्र आदिवासी जमात असून, धनगड नावाची जमात राज्यात कधीच अस्तित्वात नव्हती. मराठी/हिंदी व इंग्रजी भाषांतील उच्चारातील भाषिक फरकामुळे ही चूक घडली असून शासनाने तातडीने शासन आदेश जारी करून अनुसूचित जमातीच्या यादीतील नोंद क्रमांक 36 मधील “धनगड (Dhangad)” या शब्दाऐवजी “धनगर (Dhangar)” असे वाचावे, अशी सकल धनगर जमात चंद्रपूर जिल्ह्याची मागणी आहे.

या मागणीसाठी जालना येथे मा. दिपकभाऊ बोऱ्हाडे १७ सप्टेंबर २०२५ पासून आमरण उपोषणास बसले असून चंद्रपूर जिल्हा धनगर समाजाने त्यांना जाहीर पाठींबा दिला आहे. आंदोलन दडपण्यासाठी शासनाने जबरदस्तीचे धोरण अवलंबल्यास राज्यभर तसेच महाराष्ट्राबाहेरही हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

हे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देताना डॉक्टर मंगेश गुलवाडे (अध्यक्ष), सुनील पोराटे, कैलास उराडे, डॉक्टर यशवंत कन्नमवार, निलेश काळे, प्रवीण गिलबिले, मयूर भोकरे, वामनराव मंदे, विशाल कोरडे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.