आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत चामोर्शी येथे तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न..

 

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : मुख्यमंत्री पंचायतराज अभियान कार्यशाळेचे आयोजन आज दि. १२/०९/२०२५ ला चामोर्शी येथील सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळेला संबोधित करताना
एल. बी. जुवारे गट विकास अधिकारी,पंचायत समिती चामोर्शी यांनी मुख्यमंत्री पंचायतराज अभियाना संदर्भात सविस्तर विस्तृत सखोल माहिती दिली
कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब वानखेडे प्रकल्प संचालक जिल्हा विकास यंत्रणा जि.प. गडचिरोली,
मार्गदर्शक लुमदेव जीवारे गट विकास अधिकारी चामोर्शी,
आखाडे साहेब गटशिक्षणाधिकारी चामोर्शी,
सोमेश्वर पंद्रे साहेब सहाय्यक प्रकल्प संचालक जिल्हा परिषद गडचिरोली,कार्यशाळेत उपस्थित पंचायत समिती अंतर्गत विविध विभागीयअधिकारी, कर्मचारी तथा सर्व ग्रामपंचायत सरपंच/ उपसरपंच सदस्य गण, गाव पातळी स्तरावरील उपस्थित कर्मचारी यांना दिली.
आपल्या मार्गदर्शनातुन मुख्यमंत्री पंचायतराज अभियाना अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना बाबत माहिती देत हे अभियान यशस्वी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रतेकांनी आपआपले कर्तव्य बजावावे व प्रत्येक गावपातळीवरील नागरिकांपर्यंत पोहचवावी व योजनांची सुयोग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे
प्रशांत घोरुडे तहसीलदार चामोर्शी यांनी महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजना बाबत उहापोह करीत जनसामान्यांना योजनांचा कसा फायदा घेता येईल याबाबत मोलाचे मार्गदर्शन करीत,महसूल पंधरवाडा अंतर्गत नागरिकांना शक्यतोवर जास्तीत जास्त नागरिकांना योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करावा, मोनिका राऊत पुरवठा निरिक्षक यांनी आपल्या विभागा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. उपस्थित सर्व मान्यवरांनी कार्यशाळेला संबोधित केले.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती चामोर्शी चे अधिकारी व कर्मचारी यानी योगदान दिले. सर्व कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती च्या कल्पना म्हशाखेत्री तालुका व्यवस्थापक यांनी कार्यशाळेची धुरा सांभाळली.
सदर कार्यशाळेला पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.