आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मूल नगरपरिषद, प्रभागनिहाय आरक्षण जाहीर..

▪️अनेक प्रभागात मातब्बर इच्छुकांची कोंडी..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण रचना बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी कन्नमवार सभागृह मुल येथे जाहीर करण्यात आली. मूल नगरपरिषदेच्या १० विभागांमधील २० नगरसेवक पदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले.जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक प्रभागात मातब्बर इच्छुकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे “कही खुशी कही गम”असे वातावरण निर्माण झाले आहे.
मूल नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. पीठासीन अधिकारी अजय चरडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप दोडे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. मूल नगर परिषदेच्या एकूण १० प्रभागांमध्ये २० नगरसेवक पदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. अलिकडेच नगराध्यक्ष पद इतर मागासवर्गीय (महिला) वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे हे विशेष. प्रभाग क्रमांक १: (अ) अनुसूचित जमाती महिला आणि (ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २: (अ) इतर मागासवर्गीय महिला आणि (ब) सर्वसाधारण, प्रभाग ३: (अ) इतर मागासवर्गीय महिला आणि (ब) सर्वसाधारण, प्रभाग ४ हा (अ) इतर मागासवर्गीय आणि (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ५ (अ) इतर मागासवर्गीय महिला आणि (ब) सर्वसाधारण, प्रभाग ६ (अ) इतर मागासवर्गीय आणि (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ (अ) अनुसूचित जमाती आणि (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ (अ) अनुसूचित जाती पुरुष आणि (ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ (अ) अनुसूचित जाती महिला आणि (ब) सर्वसाधारण, प्रभाग १० (अ) अनुसूचित जाती महिला आणि (ब) सर्वसाधारण यासाठी राखीव घोषित करण्यात आला आहे.
मुल येथील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार
मुल शहरात अनेक प्रभागात फेरबदल झाले आहेत. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात राजकीय पक्षातील गट-तट उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फेरबदल हे अनेक विद्यमान आणि इच्छुकांना डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे राजकीय आणि गटा-तटाचा समतोल साधत निवडणूक लढावी लागणार असल्याची चिन्हे आतापासून दिसत आहेत. प्रभाग आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचे जुने प्रभाग आरक्षित झाले आहेत.
मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपा आणि काँग्रेस मध्ये अनेक महिला इच्छुक आहेत. मूल नगरपरिषदेवर भाजपाची सत्ता कायम राहावी यासाठी या विधानसभा क्षेत्राचे आमदार माजी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार तर काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत प्रयत्नशील असणार आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.