▪️जनकल्याण यात्रा आवाज विश्वासाचा विश्वास जनकल्यानाचा यात्रा..
▪️जनसेवेसाठी येणाऱ्या स्थानिक निवडणूकात राष्ट्रवादी कांग्रेसचा विजयी निर्धार..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : श. प्र. जनकल्याण यात्रेला चामोर्शी शहरात जिल्ह्यातील जिल्हा परिषद,नगरपालिका, नगरपरिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणूकात विजय मिळावा यासाठी मा. आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी जनकल्याण यात्रेला सबोधित करतांना सांगितले की गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असून त्याचा विकासासाठी राष्ट्रवादी कांग्रेस सत्तेत असणे गरजेचे आहे त्यामुळे आपण माय-बाप जनता ही अगामी निवडणुकात राष्ट्रवादी कांग्रेस च्या उमेदवार याना प्रचंड मतधिक्याने निवडून देवून आशीर्वाद द्यावे असे सांगितले
आजचे युग यंत्री करणाचे असून आपल्या जिल्यात नवनवीन उद्योग स्थापित होत आहे त्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा सदैव पुढाकार होता व पुढेही राहील असे माजी मंत्री आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सभेला सबोधित करताना आपले विचार प्रकट केले.
विधानपरिषद आमदार अमोलदादा मिटकरी यांनी गडचिरोली जिल्हा हा एक निसर्गाने नटलेला महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख जिल्हा असून येथे खनिज संपत्ती भरपूर असून त्याचा संवर्धन धर्मरावबाबा आत्राम हे याची योग्यारित्या जोपासना करण्याचे कार्य करीत आहे असे आपले मत मांडले
या जनकल्याण यात्रेला हजारो च्या सख्येने चामोर्शी तालुक्यातील सर्व गावातील जनता धर्मराव बाबा आत्राम यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी प्रचंड सख्येने उपस्थित होती
यावेळी मंचावर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते विधानपरिषद आमदार अमोलदादा मिटकरी मराठी सिने अभिनेत्री अमृता खानविलाकार तसेच जिल्हा अध्यक्ष रवीभाऊ वासेकर,सोनलताई कोवे डॉ. तामदेव दूधबळे,लौकिक भिवापूरे, राहुल नैताम, निशांत नैताम डॉ. अतुल सुरजागडे, डॉ. जुवारे, ऍड. श्रीकांत सुरजागडे, ऍड. डिम्पल उंदीरवाडे, विलास चरडुके, तानाजी धोंडरे, पूर्णचंद व्याहाडकर, विकास दुधबावरे, दिलकुश बोधलकार काजल नैताम सौ. व्याहाडकर तसेच
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हजारो च्या संख्येने उपस्थित होते.



