आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महायुती सरकारच्या फसव्या पॅकेजविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेधात्मक काळी दिवाळी !

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके , यांच्या नेतृत्वात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेल्या फसव्या पॅकेजचा तीव्र निषेध करण्यात आला.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी ₹५०,००० मदत, आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ₹७५,००० प्रोत्साहनपर मदत मजुरांना 25 हजार रू मदत विध्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कासोबत शिक्षणिक शुल्क माफ करावे मृत्यूझालेल्या जनावरांना प्रति जनावर 70 हजार रू मदत शेतातील गाड आणि दगड काढण्यासाठी 3.50 लाख रू मदत या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या घरात आजही अंधार असून ही दिवाळी सरकारने शेतकऱ्यासाठी काळी केली आहे ,म्हणून ही काळी दिवाळी आहे !!
जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे मनपा गट नेते संजय वैद्य. युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर युवक शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मलारप अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष बबबुभाई ईसा आदिवासी सेल शहर जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की वकील सेल शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण वाकुळकर प्रवीण अरेपल्लीवार विधानसभासभा अध्यक्ष सुरज चव्हाण समीर शेख परब गिरडकर विलास नखाते अरविंद परचाके अनिता मावलीकर नीलिमा आत्राम सचिन पुंजारे प्रदीप मेसराम सुभाष नंनवारे सरस्वती गावंडे सुमिता वैद्य रेखा नखाते रितिक धकाते उषा आत्राम भारती वाघमारे अश्विन गेडाम निशांत काटकर चंद्रपूर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढत राहील!

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.