▪️उमरी पोतदार येथे आरोग्य केंद्र तयार.. ८ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये आणि स्मार्ट आरोग्य..
▪️केंद्रासाठी दिला शब्द केला पूर्ण : माजी मंत्री आ.मुनगंटीवार

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
पोभुर्णा – ( इंडिया 24 न्युज ) : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे आरोग्यसेवेचा नवा अध्याय सुरू होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल साठी ८ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये आणि स्मार्ट आरोग्य केंद्रासाठी १ कोटी ३२ लाख ७७ हजार ४९० इतका रुपयांचा निधी मंजूर करून येथे अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र संकुल आणि स्मार्ट आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे.
ग्रामीण भागात शहरी दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, हा आ.मुनगंटीवार यांचा संकल्प या प्रकल्पातून साकार होत आहे. उमरी पोतदार परिसरातील नागरिकांना आतापर्यंत किरकोळ आजारासाठीसुद्धा बाहेरगावी जावे लागत होते; परंतु आता त्यांच्या दारातच सर्व सुविधा असलेले केंद्र कार्यान्वित झाले आहे. दिलेला शब्द पाळत नागरिकांचे स्वप्न साकार करणाऱ्या या आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाचा सोहळा उद्या दिनांक १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते पार पडणार असून, हा उपक्रम “आरोग्यदायी चंद्रपूर” या त्यांच्या संकल्पाचा ठोस पुरावा ठरणार आहे.



