आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नवनिर्मित स्वराज्य नागरी सह. पतसंस्था मर्या. मूल चा उदघाटन सोहळा संपन्न..

▪️पतसंस्थेत ठेवी, बचत वाढवून पतसंस्थारुपी रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करणे आवश्यक : श्री. लेनगुरे साहेब शाखाधिकारी सी. डी. सी. सी. बँक मुल

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727

मूल – ( इंडिया 24 न्यूज ) : आज दि. 19/10/2025 ला स्वराज्य नागरी सह. पतसंस्था मर्या. मूल या नवनिर्मित सह. पतसंस्थेचा उदघाटन सोहळा पार पडला. समारंभाचे उदघाटन जि. मध्य. सह. बँक मूल चे शाखाधिकारी. श्री. एम. डब्लू. लेनगुरे साहेब यांचे शुभ हस्ते पार पडले. अध्यक्ष स्थानी नवनिर्मित स्वराज्य नागरी सह. पतसंस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. अशोक झाडे सर हे होते. उदघाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून श्री. वासुदेव कोटगले सर, वसंतराव ताजने सर,मधुकर गोहणे सर, किसनराव वासाडे सर, मारोती शेरकी सामा कार्यकर्ता, सुजित मेश्राम हे होते.
नवनिर्मित पतसंस्थेत ठेवी, बचत वाढवून पतसंस्था रुपी रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात करणे आवश्यक असल्याचे श्री. लेनगुरे साहेब शाखाधिकारी यांनी आपल्या भाषणातून विषद केले.श्री. मधुकर गोहणे सर यांनी पतसंस्था कशी फायदेशीर चालविता येईल याविषयी सांगतांना पतसंस्थेत चालणारे कामकाज, तेथील कर्मचाऱ्यांचे कर्तव्य, पतसंस्थेत येणारे खातेदार व ठेविदार यांचेशी करण्यात येणारी वर्तणूक याविषयी अनेक उदाहरणांसह आपल्या अनुभवातून सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री. अशोक झाडे सर यांनीसदर सह. पतसंस्था निर्मितीचे उद्देश, सभासदांकडून मिळालेले सहकार्य याविषयी माहिती दिली. सोबतच सर्व सभासदांच्या व ठेवदारांच्या सहकार्याने आपली नवनिर्मित स्वराज्य नागरी सह. पतसंस्था हि उत्तुंग भरारी घेईल असे उपस्थित सभासद व ठेविदार यांना आश्वाशीत केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री. मनोहर शेरकी यांनी तर संचालन श्री. धनराज कुडे सर यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे संचालक मंडळ, ठेविदार, सभासद, अभिकर्ता व हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.