आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️संस्कृती संवर्धन मित्र मंडळ, चंद्रपूर तर्फे ‘भव्य पाडवा पहाट’ कार्यक्रम..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : संस्कृती संवर्धन मित्र मंडळ, चंद्रपूर तर्फे शुभ दीपावलीच्या निमित्ताने ‘भव्य पाडवा पहाट’ हा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठी तसेच हिंदी सुगम संगीताच्या गाण्यांनी सजलेला हा सुंदर कार्यक्रम बुधवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता, आझाद बगीचा, मेन रोड, चंद्रपूर येथे पार पडणार आहे.

आपली समृद्ध संस्कृती, परंपरा आणि संगीताची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व संवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दीपावलीच्या मंगलमय वातावरणात सुरेल सूरांच्या माध्यमातून सकाळ अधिक आनंददायी बनविण्याचा हा उपक्रम चंद्रपूरकरांसाठी एक खास पर्व ठरणार आहे.

या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या नागरिकांसाठी काही आकर्षक स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. सर्वप्रथम येणाऱ्या तीन जोडप्यांना, तसेच उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा परिधान करणाऱ्या एक पुरुष, एक स्त्री आणि तीन विद्यार्थ्यांना विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत.

संस्कृती संवर्धन मित्र मंडळाच्या वतीने सर्व नागरिकांना पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून या संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

▪️स्थान: आझाद बगीचा, मेन रोड, चंद्रपूर
दिनांक व वेळ: बुधवार,
२२ ऑक्टोबर २०२५, सकाळी ६ वाजता
🎤 आयोजक:
संस्कृती संवर्धन मित्र मंडळ, चंद्रपूर

🎶 “आपली संस्कृती – आपला अभिमान!”

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.