आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️गोंडपिपरी / गणेशपिपरी वाघाच्या हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना धनादेशाचे वितरण..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

गोंडपिपरी – ( इंडिया 24 न्युज ) : गोंडपिपरी तालुक्यातील मौजा गणेश पिपरी येथील अल्का पांडुरंग पेंदोर (वय_४५) या महिलेचा २६ ऑक्टोबर रोजी शेतात काम करीत असताना वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे पेंदोर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून (दि.३१) ला शासनामार्फत १० लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण मृत महिलेल्या कुटुंबीयांना करण्यात आले.

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या अल्का पेंदोर यांचा मृत्यू दुर्दैवी असून शासनाकडून मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या कुटुंबीयांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

यावेळी माझ्यासमवेत भाजपाचे गोंडपिंपरी तालुकाध्यक्ष दीपक सातपुते, माजी जि. प.सदस्य अमर बोडलावार, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राकेश पुन, तालुका महामंत्री सतीश वासमवार, कृ.उ.बा.समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, माजी उपसभापती मनीष वासमवार, सरपंच कोरवते, गणेश मेरूखवार, रमेश दिंगलवार ,मनोज वनकर, नितीन तुमडे, पंकज आमने शैलेश विश्वकर्मा, रोहित गुलदेवकर, मारोती पोटे , बालाजी चापले, दिवाकर कुडे, शालिक आत्राम, शामराव पेंदोर, विठ्ठल रोहनकर ,संदीप कुडे,मंगेश चौधरी, शेखर बोरुले, नितीन बोरुले, शांताराम कुकुडकर, विवेक कुबडे, यांचेसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.