आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️विकासाभिमुख कार्य करण्यासाठी जनता भाजपच्या पाठीशी : आमदार देवराव भोंगळे

▪️गडचांदूर येथील अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

राजुरा : ( इंडिया 24 न्युज ) : विकासाभिमुख कार्य करणे हेच भाजपचे ध्येय आहे. तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या न्याय, हक्कासाठी लोकाभिमुख कार्य करण्यासाठी आता जनतेने भाजपलाच पसंती दिली आहे. जनतेची पसंती हेच आमचे बळ आहे. भाजपाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपत येत आहे. असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील अनेक कार्यकर्त्यांनी राजुरा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.

देशाच्या व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान.नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान.देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेला पटले असून जनता आशेने त्यांचा स्विकार करत आहे. सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपा सरकार सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार भोंगळे यांनी यावेळी दिली.

यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये रोशन तिवारी ,भानुदास पांडे, शिवकुमार केवट, रामगोपाल निषाद, तनवीर रॉय, राजू निषाद, पप्पू केवट, सत्यनारायण केवट, बलराम केवट, राजेश गुप्ता, निलेश निषाद, कांता निषाद , नोकलाल केवट, बबलू पोद्दार, प्रसाद मोहितकर, रामकुमार निषाद, नानका केवट, प्रियांशू निषाद ,नितेश निषाद, हिमांशु निषाद, मानसिंह चव्हाण, ओमप्रकाश निषाद, सुरज निषाद, सतराम केवट, रामेश केवट ,गोदू केवट, नीरज प्रजापती, तेजबहादुर सिंह, शेर सिंह ,जितेंद्र यादव ,विवेक पंडित, रामकिशोर केवट, सुरज बार ,अमित निषाद, जुगनू भारती, अमर केवट, अनुराग केवट, अशोक मिश्रा, राहुल यादव ,शिवप्रताप निषाद, राकेश डबली, जितेंद्र कौशल, अभिषेक सिंह ,दीपक निषाद ,आकाश वर्मा, दरिया केवट यांचा समावेश आहे.

या पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार,शहराध्यक्ष अरविंद डोहे, महेश शर्मा,महामंत्री महेश घरोटे,सतीश बेतावार, शंकर आपूरकर,व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विश्वंभर झामा यांचेसह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.