▪️नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी.एन. चव्हाण यांचे निधन..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
नांदेड ( इंडिया 24 न्युज ) : दि.24 :- येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी.एन. चव्हाण (वय 84) यांचे एका खाजगी रूग्णालयात रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.
नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. याच महाविद्यालयात अनेक वर्षे त्यांनी प्राचार्य म्हणून काम पाहिले. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे सख्खे चुलत भाऊ व भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांचे ते वडिल होते.
प्राचार्य बी.एन. चव्हाण यांचे शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान होते. त्यासोबतच जिल्ह्याच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका वठविली. मराठवाडा विद्यापीठाच्या नांदेड उपकेंद्राचे ते अनेक वर्षे संचालक होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला होता. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. येथील एका खाजगी रूग्णालयात त्यांचे रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. सौ. अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आ. अमरनाथ राजूरकर, आ. श्रीजयाताई चव्हाण यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.आशिषजी गोधमगांवकर व सर्व अभिवक्ता संघ सर्व वकील बांधव तसेच कर्मचारी वर्ग यांनी तसेच नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.विना पाटील मॅडम ,प्रा.डाॅ.अल्ली सर, प्रा.डाॅ.खाकरे सर,डाॅ.चरणजित सिंघ सर,डाॅॅ.राजवंतसिंघ सर,यांसह सर्व प्राध्यापक वर्ग व कर्मचारी विधी महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी यांच्यासह त्यांच्या मित्रमंडळी व नातेवाईक यांनी प्रा.बी.एन चव्हाण यांच्या अकस्मित जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे, जुन्या आठवणींना प्रसार माध्यमांवर उजाळा दिला आहे. अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा चव्हाण, मुलगा नरेंद्र चव्हाण व मोठा परिवार आहे. आज बुधवार दि. 24 रोजी सायंकाळी 5 वाजता गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

