आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भादुर्णी येथील वन मजुरांची दिवाळी गेली अंधारात..

▪️वन मजुरांची मजुरी त्वरित अदा करा. श्री विक्रम गुरनुले सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र ब्रिगेड

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३1७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल तालुक्यातील भादुर्णी-शिवापूर या गावा लगतच्या जंगल क्षेत्रात मानव -वन्य प्राणी संघर्ष नेहमीच होत असतो. सोबतच अनेक शेळ्या, मेंढ्या, व मोठी जनावरे वाघ -बिबट च्या हल्ल्यात ठार झालीत तर काही गंभीर जखमी झालेत. वन्य प्राण्यांचे हल्ले थांबवीण्यासाठी त्यावर प्रतिबंध म्हणून मूल वन परिक्षेत्र अंतर्गत भादुर्णी -शिवापूर लगतच्या वन क्षेत्रात कक्ष क्र. ७९3,कक्ष क्र. ७९४ आणि कक्ष क्र. १००८ मध्ये झटका मशीन तारांचे कंपाउंड करण्यासाठी भादुर्णी येथील वन मजुरांना कामावर घेण्यात आले होते. सदर वन क्षेत्रातील काम हे माहे एप्रिल -मे २०२५ मध्येच केले. वन मजुरानीं सदर वनातील काम हे साधारनता एक महिना केले. सदर केलेल्या कामास पाच महिने पूर्ण झालेत. वास्तविक वन मजुरांना त्यांच्या केलेल्या कामाचा मोबदला (वन मजुरी )दिवाळी पूर्वीच मिळायला पाहिजे होता. परंतु बिचाऱ्या वन मजुरांची वन मजुरी अजूनही मिळाली नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात गेली. शेवटी हतबल झालेल्या वन मजुरानीं ही आपली गंभीर समस्या भादुर्णी येथीलच सामाजिक कार्यकर्ते व भूमिपुत्र ब्रिगेडचे पदाधिकारी श्री. विक्रमजी गुरुनुले यांची भेट घेऊन मांडली. सामाजिक जान असलेले, लोकांच्या अडिअडचणीत धावून जाणारे श्री. विक्रमजी गुरुनुले यांनी पीडित वन मजुरांना सोबत घेऊन वन परिक्षेत्र अधिकारी श्री. शेंडे साहेब यांचे समोर वन मजुरांची वन मजुरी बाबत समस्या मांडली. सोबतच ह्या गंभीर समस्येवर सविस्तर चर्चा केली. वन मजुरी पासून वंचित वन मजुरांना त्वरित वन मजुरी देण्याची मागणी करून त्या बाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यकर्ते श्री. महेश चौधरी शिवसेना तालुका संघटक, श्री. सुनील भाऊ काळे माजी शिवसेना तालुका प्रमुख, नितेशजी मेकलवार, संतोषजी चिताडे सामाजिक कार्यकर्ते भूमिपुत्र ब्रिगेड इ. कार्यकर्ते व वन मजुरीपासून वंचित वन मजूर उपस्थित होते.

सविस्तर चर्चे अंती श्री. शेंडे साहेब वन परिक्षेत्राधिकारी यांनी निधी अभावी वन मजुरी अदा करता आली नसल्याचे शिष्टमंडळास सांगितले. तसेच निवेदनाची प्रत वरिष्ठ वना- धिकाऱ्यांस मेल द्वारे सादर केली. वन मजुरीची निधी प्राप्त होताच तात्काळ वन मजुरी अदा करण्यात येईल, असे आश वासित केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.