आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️शिवसेना (शिंदेसेना )च्या मुल तालुका प्रमुखा सहित असंख्य शिवसैनिकांचा शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश..

▪️शिवसेना (उ. बा. ठा.)चे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या उपस्थितीत अनेकांचा पक्ष प्रवेश..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : आज दि. १० नोव्हेंबर २०२५ला शिवसेना (उ. बा. ठा ) तालुका कार्यालय मुल येथे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तथा जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांच्या उपस्थितीत बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार ,तालुका प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज शिवसेना पक्ष कार्यालयात स्थानिक मूल नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये आज शिवसेना शिंदेसेनेंचे माजी तालुकाप्रमुख आकाश कावळे,सौ.वैशाली भास्कर कोठारे यांनी अनेक नागरिक, युवकांनी महिला वर्गासमवेत शिवसेना (उ बा ठा ) पक्षात प्रवेश घेतला . आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सौ.टीना राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले तथा सर्व प्रभागातील उमेदवार यांची मुलाखत घेऊन चाचपणी करून पुढील पाऊल कसे टाकायचे याविषयीचे मार्गदर्शन जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे यांनी केले.तसेच शिवसेना (उ बा ठा ) बल्लारपूर विधानसभा संघटन प्रमुख नितीन येरोजवार यांनी केले.या आढावा बैठकीला मूल शहर प्रमुख बादल करपे,सूशी सरपंच अनिल सोनुले , उपतालूका प्रमुख रवी शेरकी, संदीप निकुरे , तालुका समन्वयक ओमदेव मोहुर्ले , तालुका संघटक महेश चौधरी, माजी शिवसेना तालुका प्रमुख सुनील काळे,पप्पू केदार व असंख्य शिवसैनिक हजर होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.