आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️वीज बिलावरचे नाव बदलवता येणार अर्ज तातडीने मंजूर..

▪️ग्राहकांना डिजिटल सेवा देण्यात महावितरणने घेतली आघाडी..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : ११ नोव्हेंबर २०२५:- घर, मालमत्ता खरेदी किंवा वारसा हक्कामुळे वीजबिलाच्या ग्राहक नावातील बदल आता अवघ्या तीन ते सात दिवसात होणार आहे. दर्जेदार व तत्पर ग्राहक सेवेसाठी महावितरणाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून वीजबिलावरील ग्राहक नाव बदलाच्या ऑनलाईन अर्जांना आता स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून डिजिटल ग्राहक सेवेत महावितरणाने मोठे आघाडी घेतली आहे.
अर्जाला स्वयंचलित मंजुरी:- मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्राच्या निर्देशानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. नवीन विकसित व कार्यान्वित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्जांना स्वयंचलित मंजुरी मिळत आहे. यात कोणतीही मानवी प्रक्रिया नसेल ज्यामुळे वेळ वाचेल आणि काम जलद होईल.
बिलाच्या नावात ऑनलाईन बदल करता येणार:- महावितरणने ग्राहकांना घरबसल्या सेवा देण्यासाठी डिजिटल सेवेत हा ग्राहकाभिमुख बदल केला आहे. वीज बिलावरील ग्राहक नावात बदल करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन उपलब्ध आहे. यामुळे घरगुती ग्राहकांसह इतर ग्राहकांना जलद सेवेचा लाभ होणार आहे.
कसा व कुठे करायचा ऑनलाईन अर्ज?:- महावितरणचे मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. ग्राहकांना ‘लॉग-इन’ द्वारे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि प्रक्रिया शुल्क (processing Fee) भरण्याची सुविधाही ऑनलाईन उपलब्ध आहे.
महिनाभर नव्हे आठवड्याच्या आत काम:- पूर्वी ग्राहक नावात बदलण्याच्या प्रक्रियेस कृती मानकानुसार एक महिन्याचा कालावधी लागत होता. आता अर्ज छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया स्वयंचलित झाल्यामुळे ही कार्यवाही केवळ तीन ते सात दिवसांमध्ये पूर्ण होईल.
वीज ग्राहकांना तत्पर आणि पारदर्शक सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ग्राहक नावातील बदलांना स्वयंचलित मंजुरी देण्याचा निर्णय याच दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. यामुळे ग्राहकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि त्यांची कामे वेळेत पूर्ण होतील. हरीश गजबे मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.