◼️ स्वच्छतेचे जनक संत गाडगे बाबाच्या १५० व्या जयंतीनिमित्त सिंदेवाहीत भव्य सोहळा

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही (इंडिया २४ न्यूज);दि.०१/०३/२०२६
सिंदेवाही शहरात स्वच्छतेचे जनक व मानवतेचे महान पुजारी संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती अत्यंत भव्य आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. वैराग्यमूर्ति बहुउद्देशीय संस्था आणि महाराष्ट्र राज्य धोबी, परीट, वरटी सर्व भाविक समाज महासंघ तालुका सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सकाळी राम मंदिर देवस्थान येथून निघालेल्या भव्य पालखी मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मिरवणुकीत “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर भजन व गोपालकाला वाटप आणि लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय उत्साह पूर्ण झाले.
दुपारी मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला, नगराध्यक्ष श्री भाष्करभाऊ नन्नावार यांनी अध्यक्षस्थान भूषवून समाजाच्या प्रलंबित मागण्या बाबत सकारात्मक भूमिका मांडली, समाजासाठी हक्काची जागा व समाजभावनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ मार्गदर्शक व प्रदेश उपाध्यक्ष श्री भैय्याजी रोहनकर यांनी, समाज भवनाच्या कामाचा चार वर्षाचा प्रगती अहवाल सादर केला व समाजातील एकतेचे महत्व अधोरेखित केले. विविध मान्यवराने आपल्या भाषणातून संत गाडगेबाबाच्या स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन व समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव केला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी असलेले वैचारिक नाते अधोरेखित केले.
या सोहळ्यास श्री दिलीप भाऊ रामटेके, श्यामभाऊ छत्रवानी व श्री बबनरावजी खामणकर, गोपीचंदजी गणवीर, भरतभाऊ चुनारकर यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपनगराध्यक्ष सौ. पुजाताई रामटेके, सभापती श्री मयूरजी सुचक, नगरसेवक युनिक भाऊ शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सांगता सामूहिक स्नेहभोजनाने झाली. वैराग्यमूर्ती बहुउद्देशीय संस्था व धोबी,परीट, वरठी समाज महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन हा सोहळा यशस्वी केला. आयोजकांनी सर्व उपस्थित समाज बांधव, महिला भगिनी व मान्यवराचे मनःपूर्वक आभार मानले.



