ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पाटाळा येथील एका घरात किंग कोब्रा सापाचे 7 पिल्ले व 9 अंडे आढळून..!

▪️राजू खरवडे यांच्या घरातील थरारक घटना..!

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

माजरी – ( इंडिया 24 न्युज ) : घरात कोब्रा नागाची पिल्ले आणि अंडी आढळणे ही एक गंभीर घटना आहे. कारण ती अतीविषारी असतात. असाच प्रकार पाटाळा गावातील एका घरात घडली.

 

पाटाळा येथील राजु खरवडे यांच्या घरातील कुल्लर व धान्य साठविण्याचा माच (ड्राम) याच्या मागे सापाचे पिल्ले सात व 9 अंडी आढळल्याने घरच्यांची चांगली तारांबळ उडाली. ही घटना थरकाप उडवणारी आहे. राजू खरवडे यांच्या घरी तब्बल सापाचे पिल्ले सात व 9 अंडी आढळली ते एकदम विषारी असतात. ह्या सापाला किंग कोब्रा म्हणतात. घरातील लोकानी सावध पणे दिवसभर शोध करून सगळे कोब्रा सापाच्या पिलाला पकडुन अंडे सह वर्धा नदीत सोडण्यात आले . राजु खरवडे यांचे घरी मार्गशीर्ष महिन्यात पूजापाठ असते. त्यामुळे घरातील साफ सफाई करत असताना घरातील कुल्लर व धान्य साठविण्याचे ड्राम याच्या मागे सापाचे पिल्ले सात व 9 अंडी आढळून आले. सर्पमित्र संदीप जीवणे यांनी सांगितले की हे सापाची पिल्ले व अंडी किंग कोब्रा नागाचे असल्याचे स्पष्ट केले. या सापाच्या पिलाला त्यांची आई शोधत शोधत पून्हा घरात येऊ शकते. अशा वेळी घरातील सर्वांनी घाबरून न जाता ताबडतोब वन विभाग किंवा सर्पमित्रांना बोलवावे , जेणेकरून ते सुरक्षितपणे त्यांना पकडून जंगलात सोडतील आणि स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेतील. वर्जन, घरामध्ये कोब्रा जातीचे पिल्ले व अंडे आढळने हे खुप गंभीर बाब आहे. यापूर्वी ह्या परिसरात अनेकदा सामान्य जातीचे सापं आढळून आले, परंतु आज पहिल्यांदाच मोठ्या जातीच्या कोब्रा नागाचे पिल्ले व अंडे आढळून आले, ह्यामुळे परिसरातील जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. सर्व जनतेने घाबरून न जाता आपल्या घराच्या सभोवतालचा परिसरातील घाण – कचरा स्वच्छ ठेवावा, त्यामुळे परत अशाप्रकारे वन्यजीव आपल्या परिसरात राहणार नाही .
सौ . उत्क्रांती वानखेडे , सामाजिक कार्यकर्ती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.