आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील चार वर्षीय चिमुकली मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या..

▪️मनसेच्या बल्लारपूर तालुकाध्यक्षा कल्पना पोर्तलावार यांची पोलीस अधिक्षक मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त वाढले असून महिलांना घराबाहेर पडने देखील धोक्याचे झाले आहे.
डोंगराळ येथील चार वर्षीय मुलीवर बलात्कार करून व तिच्या तोंडावर दगड टाकून निगृत हत्या करण्यात आले.
आपण या गुन्हेगारा विरुद्ध कठोर कारवाई करून यांना फासावर चढवावे ज्यामुळे अशा घटना पून्हा घडणार नाहीत आणि कुणी राक्षसीवृत्ती हिम्मत देखील करणार नाही यावर लवकरात लवकर ठोस पाउले उचलावी अन्यथा मनसे महिला सेना आक्रमक आंदोलन करणार या आशयाचे निवेदन मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री. हेमंतभाऊ गडकरी, मनसेचे चंद्रपूर जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वात मनसे महिलासेनेच्या बल्लारपूर तालुका अध्यक्षा कल्पना पोर्तलावार व जिल्हा उपाध्यक्ष मनविसे कुलदिप चंदनखेडे यांनी पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना दिले असून निवेदन देणार्या शिष्टमंडळात अश्विनीताई खोके, शुभांगीताई काकडे, आशाताई गोधडी, इंद्रताई काढताडे, सुकेशनीताई निमकर तथा मनसेचे कार्यकर्ते व मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.