▪️केळझर येथे मय्यत व्यक्तीसाठी बांबू व जळावू लाकुड उपलब्ध करून द्यावे अशी मागणी – साईनाथ लोनबले : वनहक्क समिती अध्यक्ष
▪️वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. स्वाती छाया विजय महेशकर यांना केली निवेदनाद्वारे मागणी..

*🔸डॉ. आनंदराव कुळे*
*🔸मुल तालुका प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9403179727*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : केळझर येथे मय्यत लोकांसाठी बांबू व जळावू लाकुड उपलब्ध करून देण्याची मागणी – वनहक्क समिती अध्यक्ष मा. साईनाथ दशरथ लोनबले. आजच्या विद्यमान परिस्थितीत धावपळीच्या जीवनात वेळचे महत्त्व लक्षात घेता व गॅस प्रत्येक कुटुंबात असल्यामुळे लाकुड फाटा कुणी ही स्वतः च्या घरी आणून ठेवत नाही. त्या साठी मा. सौ. स्वाती छाया विजय महेशकर वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली यांच्याशी चर्चा करून बांबू व जळावू लाकुड उपलब्ध करू द्यावी अशी विनंती साईनाथ लोनबले यांनी केली. त्यावेळी महेशकर मॅडम यांनी त्वरित मौजा – केळझर येथे नक्कीच उपलब्ध करू अशी ग्वाही दिली. व सहकार्याची भावना दिसुन आली. त्यावेळी अनेक केळझरवांसीय नागरिक सुद्धा उपस्थित होते.



