▪️चंद्रपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई MCOCA गुन्ह्यातील आरोपीला अटक..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे दाखल असलेल्या अप.क्र. ७५८/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (MCOCA) तसेच भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्ह्यातील मुख्य आरोपी बादल ललीत डोंगरे (वय २५, रा. बगड खिडकी, उडिया मोहल्ला, चंद्रपूर) यास विशेष तपास पथकाने अटक करण्यात यश मिळविले आहे.
उपरोक्त गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), सहकलम ३, ४/२५ भारतीय हत्यार कायदा आणि सहकलम ३(१)(ii), ३(२), ३(४) MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. आरोपी काही दिवसांपासून फरार होता. विशेष तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
सदर संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राजेश चुंचुवार, पो.उ.नि. दत्तात्रय कोलाटे, पोअं. रुपेश पराते, शेखर माथनकर, सुरज सिडाम या MCOCA पथकाच्या अधिकाऱ्यांने केली.



