आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नव्या दमाचे,युवा नेतृत्व स्वप्नील नागोसे शिवसेना (उ. बा. ठा.) कडून रिंगणात..

▪️प्रभाग क्रमांक ०९मधून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : मूल नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभाग ०९मधून सर्व साधारण प्रवर्गातून शिवसेना (उ. बा. ठा.) पक्षाकडून आपले नामांकन अर्ज दाखल केले.आपले सर्वांचे परिचित, सर्वांसाठी नेहमी उपलब्ध असणारे शिवसेना (उ. बा. ठा.)चे पाईक श्री. स्वप्नील देवानंद नागोसे हे शांत व प्रेमळ स्वभावाचे असून माणसे जोडण्याची सवय,समाजाची सेवा करण्याची तळमळ यामुळे त्यांचे नेतृत्व उभारी घेत आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला असून मूल शहरातील आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि बेरोजगारी इ.समस्यांचा वेळोवेळी पाठपुरावा करून,वेगवेगळे उपक्रम राबवून समस्या सोडवीण्याचा प्रयत्न केला.तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविणारा, नेहमीसाठी उपलब्ध होणारा आपला माणूस अशी ओळख असलेल्या स्वप्नील नागोसे यांनी समाजकार्यात सातत्य ठेऊन गरजूपर्यंत मदत पोहचवली आहे.
त्यांनी प्रभाग ०९मध्ये जनसंपर्क वाढविला असून प्रभागातील जनतेच्या गाठीभेटी घेऊन, समस्या जाणून घेत आहेत. सोबतच त्या सोडवीण्याच्या प्रयत्न करीत आहेत.शहराचा सर्वांगीन विकास हेच केंद्रबिंदू असून सतत जनतेच्या सेवेत कार्यरत राहणे हेच माझे ध्येय असणार आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या जनसंपर्कामुळे प्रभागातील जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. सध्यातरी त्यांची जमेची बाजू असून त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.