▪️सौं. टीना राजेश ठाकरे यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
▪️पदाधिकारी,कार्यकर्ते आणि समर्थक प्रचारासाठी एकजुटीने करताहेत जीवाचे रान..

डॉ. आनंदराव कुळे
मुल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मुल – ( इंडिया २४ न्यूज ) : मुल नगरपरिषद नगरसेवक पदाच्या निवडणूकिसाठी प्रभाग क्र. ०८ मधून शिवसेना ( उ. बा. ठा.) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौं.टीना राजेश ठाकरे यांच्या प्रचारात मोठ्या संख्येने नागरिकांचा प्रतिसाद दिसून येत आहे. त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असून त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव प्रभाग ०८ मध्ये स्पष्टपणे जाणवत आहे. मागील अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत असलेल्या सौं. टीना ताईंनी शहरातील विविध प्रश्नांना हाताळले आहे.सर्वांसामान्यांच्या हितासाठी सतत कार्यरत राहणे हेच त्यांचे ध्येय आहे. आपल्या प्रभागातील समस्यांचे निराकरण, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, तरुणांसाठी रोजगारांच्या संधी, पट्टे मिळवून देणे आणि महिला सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याचे आश्वासन त्या जनतेला देत आहेत. जनतेची सेवा हाच मुख्य ध्यास ठेऊन सतत काम करीत राहणाऱ्या सौं.टीनाताई ठाकरेंना यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.सध्या त्यांची खूपच जमेची बाजू आहे.



