आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पोलिसांची धडाकेबाज कारवाई वैनगंगा नदीपात्रातून गोवंशाची तस्करी रोखली..

▪️८ मुक्या जनावरांना मिळाले जीवदान..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : अवैध व्यवसायांवर अंकुश लावण्यासाठी चामोर्शी पोलिसांनी कंबर कसली असून, शुक्रवारी (दि. २१) एका मोठ्या कारवाईत गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळून लावला. मौजा गणपूर येथील वैनगंगा नदी घाटावरून कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ८ बैलांची पोलिसांनी सुटका केली असून, या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांना गुप्त माहिती मिळाली होती की,गणपूर वैनगंगा नदी घाटाच्या मार्गाने गोवंशाची अवैध वाहतूक होणार आहे.या माहितीची खातरजमा करत, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते १२.३० च्या सुमारास पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचला.यावेळी काही इसम बैलांना अत्यंत निर्दयतेने कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या तस्करांना घेराव घातला.​मुद्देमाल आणि आरोपी:
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख २० हजार रुपये किमतीचे एकूण ८ बैल (५ पांढऱ्या रंगाचे व ३ तांबूस रंगाचे) ताब्यात घेऊन त्यांना जीवदान दिले.
​पोलिसांनी या प्रकरणी खालील आरोपींना अटक केली आहे:
१) विलास माकोजी सुरजागडे (५५), २) चंदु गणपती चौधरी (५०), ३) मारोती यादव नानगिलवार (७५), ४) दशरथ उद्रुजी बारसागडे (५०), ५) बंडु केशव दुधबडे (४८). हे सर्व आरोपी लखमापुर बोरी, ता. चामोर्शी येथील रहिवासी आहेत. तसेच या गुन्ह्यातील सहावा आरोपी गोपिचंद मनोहर चलाख (३५) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
​गुन्हा दाखल:फिर्यादी पोलीस शिपाई भावेश वरगंटीवार यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे चामोर्शी येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(अ), ५(ब) आणि ९ अन्वये गुन्हा (अप क्र. ५१२/२०२५) दाखल करण्यात आला आहे.​ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस उपनिरीक्षक विशाल नल्लावार सहाय्यक फौजदार धनंजय मेश्राम,पोलीस शिपाई भावेश वरगंटीवार आणि पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल नल्लावार करीत आहेत.
पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांचा संदेश
बेकायदेशीर कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत!
​तस्करांसाठी इशारा:
चामोर्शी पोलीस ठाणे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, गोवंश तस्करी किंवा कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही. जे कोणी अशा बेकायदेशीर कृत्यांत सहभागी असतील,त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कायद्याचा धाक आणि सामाजिक शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर आहे.
​ दीपक डोंब (पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन, चामोर्शी)

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.