▪️नगर परिषद मूल निवडणूक : प्रभाग 05 मधून रितिक दिनेश गोयल
▪️ गरिबाच्या हाकेला धावुन जाणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित..!

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727
मूल – ( इंडिया 24 न्यूज ) : नगर परिषद मूलची येत्या 02 डिसेंबरला निवडणूक होत आहे.ही निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा प्रभागात सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 05 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून गरिबाच्या हाकेला धावुन जाणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले युवा रितिक गोयल यांना उमेदवारी दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहेत. सतत कामात तत्पर असलेला युवा कार्यकर्ता म्हणून रितिक गोयल हे मूल शहरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हे निवडून आल्यास आपली कामे त्वरित होतील असा विश्वास मतदार व्यक्त करीत आहेत.
रुग्णालयाचे काम असो वा शासकीय यंत्रणेचे काम असो ते काम करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी आपले स्वतःचे काम बाजुला सारून अग्रक्रमाने गरजू व्यक्तीचे काम करून देण्यास सतत ध्यास ठेवीत असतात. त्यामुळे कुणी नाही मात्र रितिक भाऊ हे काम करतातच असा विश्वास त्यांचेवर असल्याचे दिसते. गरीब, दिनदुबळ्यांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे, रुग्णांना मदत असो वा शैक्षणिक सुविधा—ते नेहमी लोकांसाठी उपलब्ध राहत असल्याने त्यांच्याबद्दल चांगला विश्वास निर्माण झाला आहे.
प्रभाग 05 मधील सर्वांगीण विकासाच्या मागणीला प्रतिसाद देत “नागरिकांच्या आग्रहास्तव मी रिंगणात उतरत आहे,” असे सांगत रितिक गोयल यांनी विकासाचा रोडमॅप जनतेसमोर ठेवला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सोयीसुविधा या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला आहे.राष्ट्रीय
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री. संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने मी सर्वसामान्य माणूस उमेदवार म्हणून रिंगणात आहे.
“शहर विकासासाठी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यास कटिबद्ध असल्याचे रितिक गोयल यांचे म्हणणे आहे. नागरिकांनी मला सहकार्य केल्यास अख्खे पाच वर्ष शहर विकासाबरोबरच गरीब शोषित लोकांना प्रामाणिकपणे न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ते सांगत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळेच प्रभाग 05 मधील जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना मिळत आहे.



