▪️भद्रावती पोलीस स्टेशनची मोठी कारवाई तलवारीसह दहशत माजवणाऱ्या युवकाला अटक..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या एका युवकाला भद्रावती पोलिसांनी वेगवान कारवाई करत अटक केली.
दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की सुमठाणा चौक परिसरात एक युवक तलवार घेऊन फिरत आहे.
माहितीनुसार, आरोपी प्रज्वल अशोक कोडापे (वय २२ वर्ष, रा. शिवाजी नगर, भद्रावती) हा तलवार बाळगून परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून किंमत अंदाजे १,००० रुपये मूल्याची धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. अवैधरित्या घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे भद्रावती ठाणेदार पोनि योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, पोअं. गोपाल आतकुलवार, जगदीश झाडे, अनुप आष्टुनकर, विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, रोहीत चिटगिरे व संतोष राठोड यांनी केली.



