▪️स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई अवैध रेती तस्करीवर आवडला फास..!
▪️तीन ट्रॅक्टरसह मोठा मुद्देमाल जप्त..!

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या तिघांवर मोठी कारवाई करत तीन ट्रॅक्टरसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पो. स्टे. राजुरा येथे अप. क्र. 598/25 अन्वये कलम 303(2), 3(5) BNS तसेच महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कलम 48(7), 48(8) व मोटार वाहन कायदा 130, 177 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यात अवैध रेती वाहतुकीसाठी वापरलेले तीन ट्रॅक्टर किंमत अंदाजे ₹15,00,000, तीन ब्रास रेती किंमत ₹15,000 असा एकूण ₹15,15,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे तसेच पोलीस उपविभाग राजुरा, गडचांदूर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी संयुक्तरीत्या केली.



