▪️संघटनात्मक गंभीर लक्षवेधी तक्रारीची दखल घेऊन पदभार काढला..!
▪️विविध गैरवर्तनाच्या तक्रारी आणि बोगस दिव्यांग असल्याने बडतर्फ करण्याची मागणी..!

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
नागभिड – ( इंडिया 24 न्युज ) : कायदा सर्वासाठी समान आहे हे उदिष्टये सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानाने दिलेले आहे..किशोर गुलाब पिसे यांनी जसे ईतर तक्रारीमध्ये वेळेीच चौकशी करण्याचे दायीत्व स्विकारले त्याच समान धर्तीवर आम्ही दाखल केलेल्या तक्रारीवर वेळीच चौकशी करण्याचे दायीत्व व जबाबदारी स्विकारली नाही.यावरुन स्पष्ट होते की, श्री.किशोर गुलाब पिसे हे एकाला एक न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय देवून भेदभाव व प:क्षपात केला आहे असे कागदोपत्री दिसते.तथापि, श्री.किशोर गुलाब पिसे यांनी भारतीय संविधाना्रपती एकनिष्ठ राहून कोणताही प३क्षपात व भेदभाव करणार नाही अशी शपथ घेतलेली आहे. असे असूनही श्री.किशोर गुलाब पिसे यांनी आम्ही दाखल केलेल्या तक्रारीमध्ये चौकशी करण्यास भेदभाव व प:क्षपात केला आहे म्हणजे शपथपत्राचा भंग केला आहे यासाठी श्री.किशोर गुलाब पिसे हे जबाबदार आहेत.
किशोर पिसे यांची नियमबाह्य वर्तणूक : तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांचे समक्ष शालेय आवश्यक दस्तावेज प्रभारी मु.अ.कडे सुपर्द करण्यात आले व उर्वरित आर्थिक व्यवहाराचे दस्ताऐवज नंतर देण्यात येईल असे पत्रात नमूद असताना,संबंधित शिक्षिका ह्या शाळेत अरेरावीने वागत असल्यामुळे नको ते आरोप करण्याची शक्यता असल्यामुळे पर्यवेक्षिय अधिकारी यांचे समक्ष आर्थिक व्यवहारी दस्ताऐवजचा प्रभार देण्याबाबत कळविले होते परंतु तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांनी पर्यवेक्षिय अधिकारी यंत्रणेतील कोणतेही अधिकारी न दिल्यामुळे प्रभार दिला नाही असे पत्रव्यवहार यातून दिसून येत आहे.
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव ध्वजारोहण प्रसंगी शाळेतील शिक्षिका अनुपस्थित असल्याने मुख्याध्यापक यांनी केलेल्या सुचनेचे पालन न करता वरिष्ठांच्या सुचनेचा अपमान करुन,शिवीगाळ केल्याचा आरोप स्वातंत्र्यदिनी पालक सभेत करून ,बेशिस्तपणे वागून गोंधळ निर्माण करून शांतता भंग करत बदनामी व अपमान केल्याची अध्यक्ष व मुख्याध्यापक यांच्या गंभीर तक्रारीची दखल न घेता हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून प्रकरण वाढविण्यासाठी खतपाणी घालून, जातीय द्वेषातून राईचा पर्वत करून किशोर पिसे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षिकेला पाठबळ देवून,मानसिकता खराब करून प्रतिष्ठा मलिन केली होती. नियमबाह्य पद्धतीने राजकीय दबावामुळे शिक्षिकेची बदली रद्द करुन, संरक्षण दिले होते. ज्यामुळे प्रकरण वाढीसाठी पोषक खतपाणी मिळाले.
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शिक्षकाची, खोटी माहिती सादर करून, पदोन्नती पासून वंचित ठेवले, याशिवाय अनेक तक्रारी दाखल करून दखल घेतली नाही. वैयक्तिक हिताचे प्रकरण दडवून ठेवून,लाच मागणे, महिला कर्मचारी यांना मानसिक त्रासाची वागणूक देणे. संघटनात्मक केलेल्या तक्रारीवरून पदाचा दुरुपयोग व राजकीय दबावामुळे वागल्याने कारवाई संबंधाने विभागीय आयुक्त यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना निर्देश दिले परंतु आजपर्यंत प्रशासनाकडून कारवाई न होण्याचं गुपीत गुलदस्त्यात आहे. पदाचा दुरुपयोग करून, नियमबाह्य वर्तणूक केल्याने शिस्तभंग विषयक कारवाई होणे गरजेचे होते.
किशोर पिसे यांची भूतकाळातील गैरवर्तणूक:
वन्यजीव (संरक्षण) अनिधिम १९७२ चे कलम २ (१६) ९, ३९ व ५१, नुसार वन गुन्हा क्रमांक ९१५१/ २२८७५३ दि०१५/१२/२०२१ अन्वये लावा पक्षी खरेदी करणे व शिकार करणे, गुन्हा दाखल (संदर्भ- वनपरिक्षेय अधिकारी (प्रादेशिक) चिमूर पत्र क्र./वपअ/चिमूर/1470/ चिमूर दि० १६/१२/२०२१)
वृत्तपम बातमी – नवभारत, पुण्यनगरी (१६/१२/२१)
सदर प्रकरण न्यायालयात दाखल आहे.
खरे दिव्यांगांना वंचित ठेवून ,बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरळ सेवेच्या माध्यमातून विस्तार अधिकारी शिक्षण पदस्थापना घेणे.
विनातारखेचे अपंग प्रमाणपत्र No. of GHC/338/0fice of the civil surgeon General Hospital chend Dt…….(निरंक)- सेवा पुस्तक मध्ये घेतलेल्या नोंदी मध्ये सुद्धा दिनांक लिहिलेलं नाही.
सदर बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सरळ सेवेच्या माध्यमातून विस्तार अधिकारी शिक्षण पदस्थापना घेऊन मुळ दिव्यांग कर्मचारी यांच्यावर अन्याय झाला आहे. नियक्ती आदेश क्र .शिक्षण (प्राथ.) आस्था-१/वि.अ. शि नियुक्ती १०७१/७०१३ दि० ३० मार्च २०१३ मु.का.अ.जि.प. चंद्रपूर (प्राथमिक शिक्षण विभाग)
मागणी: विविध गैरवर्तनाच्या तक्रारी आणि दिव्यांग शाश्वत ओळखपत्र ( UDID ) सादर न केल्याने, सादर करण्याच्या आदेशाला मा.न्यायालयात आव्हान देणारे वैयक्तिक व संघटनांच्या माध्यमातून लक्षवेधी तक्रारी दाखल करूनही, शिस्तभंग विषयक कारवाई साठी पात्र ठरत असूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक संरक्षण देवून, पाठराखण करित असल्याचा आरोप सागर शंभरकर जिल्हाध्यक्ष स्वतंत्र समता शिक्षक संघटना जिल्हा चंद्रपूर तथा ज्येष्ठ उपाध्यक्ष मागासवर्गीय कर्मचारी संघटनांची कृती समिती जिल्हा चंद्रपूर यांनी केला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर तक्रारीची दखल घेऊन, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिंदेवाही चा प्रभार काढला परंतु विविध गैरवर्तणाच्या तक्रारी दाखल असल्याने भविष्यात जबाबदारीचे पद देवू नये. आणि तक्रारी दाखल असल्याने दखल घेऊन, गंभीर गैरवर्तन केल्याने बडतर्फ करण्याची तत्काळ कारवाई करावी अशी संघटनात्मक मागणी करण्यात येत आहे.

